अलिगड मधील नूरपुर भागात दलित हिंदू वरातीवर इस्लामी टोळक्यामार्फत झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच एमआयएम या पक्षाचा नेता सईद नझीम अली याने हिंदुविरोधी मुक्ताफळे उधळली आहेत परवानगीविना हिंदूंची वरात जाऊ देणार नाही, अशी दादागिरीची भाषा अली याने केली आहे.
२६ मे २०१९ रोजी अलिगड मधल्या नुरपुर भागात दोन हिंदू वरातींवर हल्ला झाला होता. दोन हिंदू कुटुंबातील लग्नाची वरात ही नूरपूर भागातून जात होती. या वरातीच्या मार्गात एक मशीद होती. जेव्हा लग्नाची वरात या मशिदीच्या समोरून जात होती. तेव्हा मशिदीत असलेला इस्लामी जमाव विनाकारण संतप्त झाला. या इस्लामी जमावाने या वरातीवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हिंदू नागरिक चांगलेच बिथरले. त्यांची तारांबळ उडाली. अखेर या हिंदू नागरिकांनी त्या वारातीतून आपापल्या घरी पळ काढला.
हे ही वाचा:
‘आम्ही भजन करण्यासाठी पक्ष चालवत नाही’
कोरोना आजार नाही,अल्लाहची माफी मागून होईल सुटका! सपा खासदाराची मुक्ताफळे
बीएमसीचे ग्लोबल टेंडर हा घोटाळाच
ही घटना ताजी असतानाच असदुद्दीन ओवैसीच्या एमआयएम पक्षाच्या सईद नझीम अली याने एक वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू समाजाच्या वरातींना जायचे असल्यास त्यांनी परवानगी घेऊन जावे. परवानगी विना हिंदू समाजाच्या कुठल्याही वारातील जाऊ देणार नाही असे प्रक्षोभक विधान अली याने केले आहे. गुरुवारी माध्यमांशी बोलताना त्याने ही मुक्ताफळे उधळली. सईद अली हा एमआयएम या पक्षाचा उत्तर प्रदेशचा युवक अध्यक्ष आहे.
२६ मे च्या घटनेनंतर अलिगड मधल्या नुरपुर भागातून हिंदू पलायनाच्या घटना समोर येत असल्याचे म्हटले जात आहे. अनेक हिंदूंनी आपल्या घराबाहेर घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे फलक लावले आहेत. तर काहींनी घर विकून पळ काढलेला आहे.