जितक्या मंदिरांचे पुरावे सापडतील तितक्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्धार

जितक्या मंदिरांचे पुरावे सापडतील तितक्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभलमध्ये जेवढी पण मंदिरे असतील त्या सर्व मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी आतापर्यंत शहरातील ५४ हून अधिक तीर्थस्थळे शोधून काढली असून उर्वरित तीर्थस्थळे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एएनआयशी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन हिंदू धर्माची ही स्थळे भारताच्या वारशाचे प्रतीक आहेत यावर भर दिला. “जे काही आहे ते आम्ही शोधू. आम्ही जगाला दाखवू. ज्यांना देवाने डोळे दिले आहेत, त्यांना पाहू द्या. संभलमध्ये काय घडले? संभल हेच सत्य आहे,” अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या आहेत. तोडफोड झालेल्या हिंदू मंदिरांच्या अवशेषांवर बांधलेल्या मशिदींच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना आदित्यनाथ म्हणाले की, “इस्लाम म्हणतो की हिंदू मंदिरे नष्ट केल्यानंतर बांधलेली पूजास्थळे देवाला मान्य नाहीत. मग ती का बांधली गेली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी निर्धाराने वक्तव्य केले की, जितक्या मंदिरांचे पुरावे सापडतील तितक्या मंदिरांचे सरकार पुनरुज्जीवन करणार. आम्ही ५४ हून अधिक ठिकाणे ओळखली असून उर्वरित ठिकाणांचा शोध घेत आहोत. वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत. आम्ही ती कुठे आहेत ते दाखवत आहोत आणि आम्ही त्यांना एक-एक करून सोडवू.

हे ही वाचा : 

संभल हिंसाचारात सहभागाच्या आरोपाखाली सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांना नोटीस

अमेरिकन निवडणुकांमध्ये बदल करण्यासाठी ट्रम्प यांची कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी; भारताचे का दिले उदाहरण?

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर सीबीआयकडून छापेमारी

कर्जतचे फार्म हाऊस, ड्रग्ज, मुलांचे लैंगिक शोषण मेंदू गरगरवणारे आरोप…

संभल आणि बहराइच येथे झालेल्या गाझी सालार मसूद मेळ्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, नवीन भारतात हल्लेखोरांसाठी कोणतेही स्थान नाही. योगी आदित्यनाथ म्हणाले की, मसूदसारख्या लोकांचे गौरव करणे हा देशाचा अपमान आहे. त्यांना आदर्श म्हणून पाहिले जाऊ नये आणि नवीन भारतात त्यांच्यासाठी कोणतेही स्थान नाही. हल्ले साजरे केले जाऊ नयेत. हे देखील ओळखले पाहिजे की हे हल्ले परदेशी लोकांनी केले होते. त्यांनी भारताच्या श्रद्धेला लक्ष्य केले, भारतीय बहिणी आणि मुलींचा अपमान केला आणि देश लुटला. त्यांचा गौरव करणे हे भारतीयांच्या श्रद्धेचा अपमान आहे. त्यांचा गौरव करून आपण देशाचा अपमान करतो आणि मला विश्वास आहे की भारतातील कोणीही हे स्वीकारणार नाही, असे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्जतचे फार्म हाऊस, ड्रग्ज, मुलांचे लैंगिक शोषण, मेंदू गरगरवणारे आरोप... | Dinesh Kanji |

Exit mobile version