मुंबईतील वाढत्या रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे फक्त पोलिसांची नाही, तर आपल्या समाजाची देखील डोकेदुखी वाढली आहे. वाढती गुन्हेगारी, आमलीपदार्थांचा व्यापार इतकच नाही तर त्यांनी या वेळी मतदान देखील केले. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे कि, त्यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीची पुन्हा तपासणी करावी आणि त्यामधील रोहिंग्या किंवा बांग्लादेशी नागरिकांची नावे काढून टाकावी, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.भारतीय जनता पार्टीद्वारे वसंत स्मृती येथे आयोजित केलेल्या प्रादेशिक बैठकीनंतर मंत्री लोढा बोलत होते.
एटीएस अतिशय चांगल्या रीतीने त्यांची धरपकड करत आहे आणि त्यांना परत पाठवत आहे. आम्ही मुंबई उपनगरात यासाठी एक विशेष टीम सुद्धा गठीत केलेली आहे. जोपर्यंत रोहिंग्या बांग्लादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. असे मत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा..
सराफा व्यापाऱ्याकडून शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या विरोधात फसवणूकीची तक्रार
अंतरवालीत जरांगेंनंतर ओबीसी आक्रमक, उपोषण सुरु!
“ठाकरेंनी चार महिने ज्यांचे पाय पकडले त्यांच्यामुळेच माविआला मतदान”
उजैनमध्ये सट्टेबाजांवर पोलिसांचा छापा, १४.५८ कोटी रुपये जप्त!
अनधिकृतरित्या कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकांच्या हक्काच्या सुविधा घुसखोरांना मिळत असल्याने आज कठोर कायद्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री या बाबतीत सजग असून, त्यावर योग्य कार्यवाही होईल असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.