संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे.जर एखादा दहशतवादी पाकिस्तानात पळून गेला तर आम्ही त्याला तिथेही ठार करू. भारतातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणत्याही दहशतवाद्याने केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.न्यूज १८ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.
वास्तविक, ‘गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, देशात कोणत्याही दहशतवाद्याने कोणत्याही प्रकारची घटना घडवली तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. दहशतवादी घटना घडवून एखादा दहशतवादी पाकिस्तानात पळून गेला तर आम्ही पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करू, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
हे ही वाचा:
संजय राऊत यांच्या कानपिचक्या: काँग्रेसने दिल्लीत राजकारण करावे, गल्लीत नव्हे!
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी मुस्लिम कुटुंबांचे प्राण वाचवले!
राहुल गांधींना ‘उभे’ राहण्याचीही शिस्त नाही का?
हेमंता बिस्वा सरमा यांनी दिली इंडियन एक्सप्रेसला नोटीस
‘भारताकडे क्षमता आहे’
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, ‘जर दहशतवादी पाकिस्तानात पळून गेले तर आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना पाकिस्तानच्या भूमीवर ठार करू.पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे म्हणाले आहे की… भारताकडे ती क्षमता आहे आणि पाकिस्तानलाही ते समजू लागले आहे.दरम्यान, ब्रिटनचे दैनिक ‘द गार्डियन’ने भारतावर अजब आरोप केला. भारतविरोधी कारवाई करणाऱ्यांवर परदेशात हत्या आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल फेटाळला आहे. तसेच त्यांना खोटा आणि दुर्भावनापूर्ण प्रचार असे म्हटले आहे.