शिवाजी महाराजांचे मंदिर नको, आधी गडकिल्ल्यांचे संवर्धन करा!

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

शिवाजी महाराजांचे मंदिर नको, आधी गडकिल्ल्यांचे संवर्धन करा!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधाकांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. जाहीरनाम्यातून विविध अशी आश्वासने जनतेला देण्यात आली आहेत. आज (१५ नोव्हेंबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ‘आम्ही हे करू’ या नावाने  पक्षाचा जाहीरनामा प्रकाशीत केला.

राज ठाकरेंनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत जाहीरनाम्यातील महत्वाच्या मुद्यांची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष झाले आहे. या १९ वर्षांत मनसेने काय-काय केले? त्याची माहिती देखील जाहीरनाम्यात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेने प्रकाशीत केलेल्या जाहिरनाम्याच्या पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केले आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

“कोमट” पाण्यातील गॅरंटीच्या “चकल्या”

काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!

शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली

‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास!

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या जाहीरनामाचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्यभरात शिवाजी महाराजांची मंदिरे उभी करणार, असे म्हटले आहे.  पण त्याऐवजी राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचे आहे आणि राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मग शिवाजी महाराजांच्या मंदिरांची गरज काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, राज्यातील मुलांना शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे.

 

Exit mobile version