जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (१६ सप्टेंबर) जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सभा घेतली आणि काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार हल्ला चढवला. रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, आम्ही जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला गाडून टाकू.
गृहमंत्री अमित शहा सभेला संबोधित करताना म्हणाले, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे आपल्या ‘परिवाराचे सरकार’ बनवण्याचे प्रयत्न करत आहे. या दोन्ही पक्षांची सत्ता जम्मू-काश्मीरमध्ये येणार नाही. ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत गृहमंत्री शाह म्हणाले, राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार ते जमिनीत गाडून टाकेल.
कांग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरला पुन्हा दहशतवादाकडे ढकलायचे आहे. काँग्रेस आणि एनसीचे सरकार सत्तेवर आले तर ते दहशतवाद सुरू करतील. पण मी तुम्हाला वाचन देतो की, आम्ही दहशतवादाला गाडून टाकू. दहशतवादाला अशा पातळीवर गाडून टाकू की, ते परत येवू शकणार नाहीत, असे गृहमंत्री शाह म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातील कामाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
हे ही वाचा :
कावड यात्रेला विरोध केल्याने हिंदूंनी ईदची मिरवणूकही रोखली !
यूपीमध्ये लव्ह जिहाद, आरोपी मोहम्मद आझम झैदीला अटक !
उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!