महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर जर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असतील तर आम्हाला कोणतीही समस्या नाही, असे विधान शिवसेना एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ते गुलाबचंद दुबे यांनी एका वाहिनीवर चर्चा करताना मान्य केले.
ते म्हणाले की, आम्हाला काहीही हरकत नाही. आमचे ३७ आमदार असतानाही आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रीपद दिले. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. उद्या भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर आम्ही त्याचे सहर्ष स्वागतच करू.
गुलाबचंद दुबे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे पक्ष गेल्या २६-२७ वर्षांपासून एकत्र आहेत. त्यात आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर त्याचा सहर्ष स्वीकार करू. आता आमची कितीही संख्या असेल तरीही आम्ही भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर तो नक्कीच स्वीकार करू.
२३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांची मतमोजणी जाहीर होणार आहे. त्यावेळी महायुती की महाविकास आघाडी याविषयी चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने झालेल्या चर्चेत दुबे यांनी शिवसेनेची ही भूमिका स्पष्ट केली.
हे ही वाचा:
विनोद तावडेंनी राहुल गांधी, खर्गेंना पाठविली १०० कोटींची नोटीस!
बूमराहच्या दणक्याने कांगारू कोलमडले
शनिवारी महाराष्ट्राच्या भवितव्याचा होणार निर्णय
शेअर बाजारात अदानी समूहाच्या समभागात सुधारणा
महायुतीत असलेल्या प्रत्येक पक्षाने आपला नेता मुख्यमंत्री बनावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची नावे त्यांच्या समर्थकांकडून वारंवार घेतली जातात. मात्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वीकारले जाईल का, याविषयी शंका उपस्थित केली जात होती पण एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्याकडूनच आता त्यामध्ये असलेला संभ्रम दूर केला आहे.