‘मतदान केंद्रावर दिरंगाई हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे’

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

‘मतदान केंद्रावर दिरंगाई हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे’

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे.महाराष्ट्रामध्ये हा शेवटचा टप्पा आहे.सकाळपासूनच राज्यात जोरदार मतदान सुरू आहे.परंतु, मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रावर दिरंगाई सुरु आहे.यामुळे मतदारांना रांगेत वेळ काढावा लागत आहे.दरम्यान, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मतदान केंद्रावर होत असलेल्या दिरंगाईवर भाष्य केले.तसेच निवडणूक आयोग आणि पंतप्रधान मोदी सरकारवर त्यांनी टीका केली.उद्धव ठाकरेंच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.उद्धव ठाकरेंचे हे नेहमीचेच रडगाणे असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत असल्याचा टोला देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली.आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.

हे ही वाचा:

‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटींचा परदेशी निधी

छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप खड्ड्यात उलटली, १७ जणांचा मृत्यू!

शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल!

अहमदाबाद विमानतळावर इसिसशी संबंधित श्रीलंकन नागरिकांच्या मुसक्या आवळल्या

माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. ६ वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असं उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version