राज्य कारभार कसा करावा याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. आज पर्यावरण संवर्धन कसे करावे हे जर शिकायचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकावे. त्यांची अर्थनीती, युद्धनीती, राजनीती अशा नितींवर आज जगभरात अभ्यास होत आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच आम्हाला कारभार करायचा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील कुर्ला इथ पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार पराग आळवणी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. राज्य कसे चालवायचे याचे तंत्र शिवरायांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोमध्ये भारताची एन्ट्री ही शिवाजी महाराजांच्या गड किल्ले म्हणून पाठवली आहे. भारताच्या विविध राज्यातून यासाठी ५० वर प्रस्ताव पाठवले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समावेश त्यासाठी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते संपूर्ण राजे होते. त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या विचारावरच आपण या नाव भारताची निर्मिती करू शकतो, याचा अभिमान आहे, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा :
बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची झिशान सिद्दीकीवर कारवाई!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रसंगावधान; मुलीचे वाचवले प्राण!
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
अनुष्का, विराटच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन
खासदार पूनम महाजन म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले मंदिर उभारण्याचे भाग्य मला मिळाले आहे. या महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शिवप्रेमींनी या मंदिरात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या मंदिरात रोज दोन वेळ महाराजांची आरती होणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार पराग आळवणी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला उत्तर मुंबई जिल्हा परिसरातील नागरिक, शिवप्रेमी उपस्थित होते.