हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नसताना आता या नव्या युद्धाची भर पडली आहे. आखाती युद्ध पेटल्यामुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिका सदैव इस्रायलच्या पाठिशी राहील, असे आश्वासन दिले आहे. तसेच, ‘या हल्ल्याचा इस्रायलच्या कोणत्याही शत्रूने गैरफायदा घेऊ नये,’ असा इशाराही दिला आहे.
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेची भूमिका मांडली. ‘अमेरिका इस्रायलच्या पाठिशी आहे. आम्ही त्यांचा हात कधीही सोडलेला नाही. त्यांना त्यांच्या नागरिकांना आवश्यक असलेली सर्व मदत मिळेल आणि ते स्वतःचा बचाव करत राहू शकतील, याची आम्हाला खात्री आहे,’ असे जो बायडेन यांनी स्पष्ट केले. इस्रायलला स्वतःचा आणि स्वतःच्या लोकांचा बचाव करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.
हे ही वाचा:
हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर
ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा
एनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे का उपटून टाकण्यात आली?
विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय!
दहशतवादी हल्ल्यांचे कधीही समर्थन करता येणार नाही आणि इस्रायलच्या सुरक्षेसाठी माझे प्रशासन सदैव कटिबद्ध असेल,’ असे बायडेन यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमला इजिप्त, तुर्की, कतार, सौदी अरेबिया, जॉर्डन, ओमान, संयुक्त अरब अमिराती आणि युरोपीय मित्र देशांसह संपूर्ण प्रदेशातील परिस्थितीबद्दल सदैव संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या परिस्थितीचा कोणत्याही देशाने विशेषतः इस्रायलच्या शत्रूंनी गैरफायदा घेऊ नये, असा इशाराही दिला आहे.