डॉ. रेड्डीज लॅबोरेटोरिज या कंपनीकडून मे महिन्यापर्यंत रशियातून आयात केलेली स्पुतनिक-५ ही लस उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यानंतर ही कंपनी स्वतःच भारतातील त्यांच्या उत्पादनाला सुरूवात करेल अशी माहिती मिळत आहे. या कंपनीला कालच केंद्र सरकारकडून लस आयात करून त्याच्या वितरणाची देखील परवानगी दिली होती.
डॉ. रेड्डीज आणि भारत सरकार यांच्यात या लसीच्या किंमतीवरून चर्चा चालू असल्याचे देखील समजले आहे. त्याबरोबरच सुरूवातीच्या काळात किती डोसेसचा पुरवठा केला जाईल याबाबत देखील वाटाघाटी चालू असल्याचे कळले आहे.
हे ही वाचा:
पुण्यातील व्यापारी लॉकडाऊन विरुद्ध उच्च न्यायालयात
उद्धव यांच्यापेक्षा राज एक पाऊल पुढे!
सीबीएसई परिक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय
अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले
मिंट या संकेतस्थळावर याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आहे. डॉ. रेड्डी या कंपनीने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड सोबत भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण करण्यासाठी आणि सुरूवातीला देशात २५ कोटी लसींचा पुरवठा करण्यासाठी करार केला आहे. आरडीआयएफने इतर पाच कंपन्यांसोबत देखील करार केला आहे. या सर्व कंपन्या मिळून देशांतर्गत वापरासाठी आणि निर्यातीसाठी ८५ कोटी लसींची निर्मीती करणार आहेत.
आरडीआयएफचे प्रमुख किरिल दिमित्रीएव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी काही कंपन्यांनी लसीच्या उत्पादनाला सुरूवात केली आहे आणि ते उत्पादन रशियातील गुणवत्ता चाचणीत देखील उत्तीर्ण झाले आहेत. परंतू या लसी भारताला देण्यात येणाऱ्या लसींमध्ये सामील असतील की नाही, यावर त्यांनी भाष्य केले नाही.
डीजीसीआयने कालच स्पुतनिक-५ लसीच्या भारतातील आपात्कालिन वापराला परवानगी दिली आहे. रशियात घेण्यात आलेल्या चाचणीनुसार या लसीची परिणामकारकता ९१.६% आहे.