इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू असताना अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील न्यूयॉर्क टाइम्स इमारतीच्या बाहेर पॅलेस्टिनी समर्थकांनी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली.गुरूवारी कार्यकर्त्यांनी द न्यूयॉर्क टाइम्सच्या कार्यालयात घुसून तिची लॉबी ताब्यात घेत गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या नावांची यादी वाचून दाखवत घोषणा बाजी केली.तसेच गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीची मागणी त्यांनी केली.इस्रायल-हमास युद्धाच्या कव्हरेजमध्ये मीडियाने इस्रायलबद्दल पक्षपातीपणा दाखवल्याचा समर्थकांचा आरोप आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी हजारो निदर्शकांनी पॅलेस्टिनी झेंडे घेतले आणि गाझावरील इस्रायलच्या बॉम्बफेकीच्या विरोधात घोषणाबाजी केली. संध्याकाळी ५ च्या सुमारास मीडिया कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली लोकांचा एक छोटासा गट आहे जो स्वतःला “रायटर्स ब्लॉक” म्हणून समजतात.त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या लॉबीमध्ये बॅनरसह प्रवेश केला, असे असोसिएटेड प्रेसने वृत्त दिले आहे.हे सर्व मीडिया कर्मचार्यांनी आहेत.
हे ही वाचा:
कंगाल पाकिस्तानकडे पासपोर्ट लॅमिनेशन करायला पेपरचं नाही!
रामनगरी अयोध्या उजळणार लक्षलक्ष दिव्यांनी
हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन मुंजाल यांच्या मालमत्तेवर टाच!
कार्यकर्त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या व्यवस्थापनाकडे गाझामधील युद्धबंदीची मागणी केली.त्यांच्यापैकी काहींनी पॅलेस्टिनी झेंडे फडकावले तर काहींनी गाझामध्ये मारल्या गेलेल्या हजारो पॅलेस्टिनी नागरिकांची नावे वाचून दाखवली.या यादीमध्ये ३६ पत्रकारांचा समावेश आहे. इमारतीच्या लॉबीमध्ये प्रवेश करण्याऱ्या समर्थकांना पांगवण्यात पोलिसांना तासाभराने यश आले.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची माहिती अद्याप आली नसून या आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
द न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार , इमारतीच्या बाहेर पार्क करण्यात आलेली न्यूयॉर्क पोलिस विभागाच्या (NYPD) गाडीची मागील काच फोडण्यात आली असून गाडीच्या एका बाजूला ‘फ्री गाझा’ असे स्प्रे ने पेंट केलं आहे.
दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात १०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.