मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची एका कार्यक्रमात भाजपावर टीका करताना जीभ घसरली. तसेच १९९२ ला पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीचे त्यांनी शहीद म्हणून वर्णन केले. सिंह म्हणाले, जेव्हा बाबरी मशीद शहीद झाली तेव्हा मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. १९४७ मध्येही भोपाळमध्ये अशा दंगली झाल्या नव्हत्या, पण बाबरी मशीद पाडली तेव्हा दंगली झाल्या. ते पुढे म्हणाले, आम्ही दंगली घडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान, दिग्विजय सिंह हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. क्रीडा आणि युवा कल्याण विभागाचे मंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी हा व्हिडीओ ट्वीटकरत दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शाजापूरच्या चौबदारवाडीमध्ये मुस्लिम समुदायाकडून सद्भावना परिषदेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार दिग्विजय सिंह यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना दिग्विजय सिंह यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याची जीभ घसरली. ते म्हणाले, “जेव्हा बाबरी मशीद शहीद झाली, तेव्हा मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. मी जवळजवळ दोन आठवडे राज्य काँग्रेस समितीच्या कार्यालयात रात्री घालवल्या. घरी गेलो नाही. पण हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र करून आम्ही दंगली घडवण्याचा प्रयत्न केला.” खरेतर, काँग्रेस नेत्याला ‘दंगली थांबवण्याचा’ असे म्हणायचे होते मात्र त्यांनी ‘दंगली घडवण्याचा प्रयत्न केला’ असे म्हटले.
हे ही वाचा :
खाजगी आयुष्यावरील अफवा मानसिक आरोग्यावर परिणाम करतात
अरोरा यांचा काँग्रेस आणि सुखबीर बादल यांच्यावर हल्ला
‘नॅशनल हेराल्ड’ : आर्थिक गैरव्यवहारावर सरदार पटेल यांनीही नेहरूंना दिली होती चेतावणी…
पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला !
यावर मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास कैलाश सारंग यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या दंगल भडकवण्याच्या विधानावरून त्यांच्यावर निशाणा साधला. व्हिडिओ ट्विट करत ते म्हणाले, दिग्विजय सिंह यांची कबुली ऐका. बाबरी मशिदीला शहीद म्हणणारे दिग्विजय सिंह यांनी हे स्पष्ट केले आहे की त्यांनी दंगल भडकवली. दिग्विजय सिंह यांची मानसिकता हिंदूविरोधी आहे. काँग्रेसने नेहमीच दंगली भडकवण्याचे काम केले आहे, असे मंत्री विश्वास कैलाश सारंग म्हणाले.
सुनिए दिग्विजय सिंह का काबुलनामा !
बाबरी मस्जिद शहीद होने पर दंगे हमने करवाए ! pic.twitter.com/LtdS3jIO3n— विश्वास कैलाश सारंग (@VishvasSarang) April 17, 2025