भारताच्या शेजारील बांगलादेशातील परिस्थिती अजूनही सामान्य नाही. आंदोलक हिंदूंच्या घरांवर आणि मंदिरांवर हल्ले करत आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशात राहणारे हिंदू भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अनेक बांगलादेशी सुद्धा भारतात येण्यासाठी सीमेवर जमा झाले आहेत. शेकडो बांगलादेशी नागरिक आणि हिंदू कूचबिहारमधील भारत-बांगलादेश सीमेवर एकत्र जमले आहेत. सध्या हे सर्व लोक बांगलादेशात पडणाऱ्या भागात उभे आहेत. सीमेवर काटेरी कुंपण असून सीमेवर बीएसएफचे सैनिक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, सीमेवर जमलेल्या बांगलादेशी नागरिकांना बीएसएफचे जवान समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
सीमेवर जमलेल्या बांगलादेशी नागरिकांना संबोधित करताना बीएसएफ जवान म्हणाला की, तुम्हा सर्वांना बंगाली भाषा समजत असेल तर मी जे सांगतोय ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे. तुमची समस्या आम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला ही समस्या समजते. तुम्ही लोक इथे आलात. हा चर्चेचा विषय आहे. अशा समस्येवर उपाय नाही. कारण, आम्ही तुम्हाला स्वेच्छेने आत घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही जर आवाज केलात तर आम्ही जे काही बोलतोय ते तुम्हाला समजू शकणार नाही.
बीएसएफ जवान पुढे म्हणाला की, वरिष्ठ अधिकारीही येथे आले आहेत आणि त्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, ही समस्या एका दिवसात सुटू शकत नाही. आमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलले आहेत आणि त्यांच्याकडून म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांकडून संदेश आला आहे की, ते ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून तुम्हाला विनंती करत आहोत की तुम्ही परत जा.
हे ही वाचा :
पोलिसांना सापडला ‘मोरावर चोर’, तेलंगणातील यूट्युबरला अटक !
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा
रामलला झाले अब्जाधीश, भाविकांनी अर्पण केले ५५ अब्ज रुपये !
अदानी समूहाचे शेअर्स कोसळले, पण शेअर मार्केटवर परिणाम नाही
दरम्यान, बांगलादेशातील सत्तापालटानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारचा शपथ सोहळा पार पडला आहे. देशातील अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाहीये. बांगलादेश सरकाराच्या भूमिकेवर भारत देखील लक्ष ठेवून आहे.