आता बस झालं…किमान वेतन द्या, दुकाने उघडा

आता बस झालं…किमान वेतन द्या, दुकाने उघडा

व्यापाऱ्यांची आग्रही मागणी

राज्यातील टाळेबंदी वाढण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर आता व्यापारी वर्गही अस्थिर झालेला आहे. गेले कित्येक महिने दुकाने बंद असल्यामुळे व्यापारी वर्गाचे तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक दुकाने आता कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबतच इतर दुकानेही नियमांच्या अधीन राहून उघडण्याची परवानगी द्या, अशी आग्रही मागणी आता व्यापाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

महाराष्ट्र सरकार आपले निर्बंध आणखी १५ दिवसांपर्यंत वाढवण्याचा विचार करीत असताना, व्यापारी आणि त्यांच्यावर आधारीत असणारे घटक यांचाही विचार करावा, अशी मागणी आता व्यापारी वर्गाकडून सरकारला करण्यात येत आहेत.

राज्यातील केवळ २० टक्के दुकाने अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात. उरलेली ८० टक्के दुकाने ही आज बंद आहेत. परंतु या दुकानांचे मालक आणि कर्मचारी वर्ग मात्र हातावर हात धरुन बसलेले आहेत. यांचे झालेले नुकसान हे आकड्यात मोजता येणार नाही.

हे ही वाचा:
वसुलीच्या ‘मातोश्री कनेक्शन’ची जोरदार चर्चा

लस खरेदीत पालिकेची दमछाक; खासगी रुग्णालयांनी टाकले मागे

अनिल देशमुख नंतर अनिल परब, फक्त दोन महिन्यांचे पाहुणे

बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण

व्यापारी संघटनेने आता सरकारकडे किमान वेतनाची मागणी केलेली आहे. सद्यस्थितील राज्यामधील ८० टक्के दुकाने बंद असून, यावर आधारित कर्मचारी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दुकानांचे वेळ वाढवावी जेणेकरून ग्राहकांनाही सोयीचे होईल अशी मागणी आता व्यापारी संघटना करताना दिसत आहे.

काही व्यापारी सध्या सुरु असलेल्या सकाळी ११ ते १ या वेळेपेक्षा जास्त तासांसाठी दुकाने उघडण्याची मागणी करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्‍या दुकानांना जास्त काळ खुले ठेवण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी आता ग्राहक आणि व्यापारी दोन्ही बाजूंनी करण्यात येत आहे.

दुपारी १२ ते ६ या वेळेत दुकाने चालू ठेवणे योग्य ठरेल, असे व्यापारी नेते आणि भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्यासमवेत फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह म्हणाले.

चेंबर मर्चंट्स असोसिएशनचे किशोर कुलकर्णी म्हणाले की, एकीकडे सरकार आमच्याकडून कर घेते. पाणी आणि मालमत्ता करही घेतला जातो, पण दुकाने मात्र बंद ठेवायला सांगितली जातात. शॉपिंग सेंटर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष मुकेश कुमार म्हणतात की, सुरक्षित वातावरणात दुकाने हळूहळू उघडणे हाच यावरील उपाय आहे. आधीच ३००० कोटींचे नुकसान झाले आहे. आणखी नुकसान सहन होण्यापलिकडे आहे. कोरोनाचे रुग्ण आता कमी होत आहेत. त्यामुळे सर्व काळजी आणि प्रतिबंध यांचा अवलंब करून दुकाने उघडण्याची वेळ आली आहे.

अनलॉक टप्प्यात देशाच्या हळूहळू सुरूवातीच्या काळात मॉल केवळ नंतरच्या टप्प्यावरच उघडण्याची परवानगी दिली होती.

 

Exit mobile version