आम्ही भिक्षा मागितली नाही. ममता बॅनर्जींनी स्वतः सांगितले होते कि त्यांना युती हवी आहे. आम्हाला ममता बॅनर्जींच्या दयेची गरज नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. ममता बॅनर्जींना प्रत्यक्षात युती नको आहे कारण त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवेत व्यस्त आहेत, असे खळबळ विधान कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या आहेत. यावरून कॉंग्रेस पक्षात नाराजी आहे. टीएमसीचा असा विश्वास आहे की राज्यातील प्रबळ पक्षाला जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्याची मुभा असायला हवी. टीएमसीकडून कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची संयोजक म्हणून निवड करावी. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्या पेक्षा विरोधी आघाडीचे संयोजक म्हणून खर्गे यांचा चागला प्रभाव पडेल, असा विश्वास टीएमसीने व्यक्त केला आहे.
हेही वाचा..
प. बंगालमधून दीड लाख अमेरिकन डॉलर जप्त
अन्य धर्माबद्दल बोलले असते तर आव्हाड जिवंत तरी राहिले असते का?
श्रमजीवी बॉम्बस्फोट प्रकरणात दोघांना फाशी
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची मदत?
डिसेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर टीएमसीने ३१ डिसेंबरपर्यंत जागा वाटपाचा तपशील मागवला होता. ती मुदत आता संपली आहे. तरी इंडी आघाडीमध्ये जगावाटपाबद्द्ल अद्याप एकमत होऊ शकलेले नाही.