‘आम्ही आमच्या दाव्याच्या समीप’

ज्ञानवापीच्या हिंदू पक्षाच्या वकिलांचा दावा

‘आम्ही आमच्या दाव्याच्या समीप’

ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे तिसऱ्या दिवसाचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणानंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, आम्ही आमच्या दाव्याच्या समीप पोहोचलो आहोत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे पथक सतत त्यांचे काम करत आहे. अर्थात या बाबत फार काही सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. सर्वेक्षण विभागाच्या पथकाला जे काही आढळले आहे, ते त्यांच्या अहवालात नमूद करणार आहेत. तसेच, सोमवारीही हे सर्वेक्षण सुरूच राहणार आहे.

सर्वेक्षणाचे काम योग्य दिशेने जात आहे. सर्वेक्षण पथक ठरलेल्या भागात सर्वेक्षण करते आहे. प्रारंभिक काम पूर्ण झाले आहे. सोमवारीही सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम चालेल, असे हिंदू पक्षाचे वकील सुभाष चंदन चतुर्वेदी यांनी सांगितले. वादिनी सीता साहू, रेखा पाठक आणि लक्ष्मी यांनीही सर्वेक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. आम्ही ज्या प्रतिकृतींबाबत सांगितले होते, त्या तेथे आहेत. अर्थात सर्वेक्षण पथक संपूर्ण तपास करते आहे. त्यामुळे याबाबत आणखी काही सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

आमचा दावा मजबूत आहे आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबी समोर येतील, असेही ते म्हणाले. मुस्लिम पक्ष या सर्वेक्षणात सहकार्य करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. पश्चिमेकडील भिंतीच्या बाजूला रविवारी सर्वेक्षण केले गेले, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातील खासदारकी पुन्हा बहाल

देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टरस्ट्रोकने ठाकरेंना घरी बसवणारे मास्टर

ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?

चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले

शनिवारी झालेल्या सर्वेक्षणानंतर हिंदू पक्षाचे वकील सुधीर त्रिपाठी यांनी ढिगाऱ्यातून मूर्ती नव्हे तर मूर्तींचे तुकडे मिळाल्याचे स्पष्ट केले. तेव्हा त्यांनी मूर्तीही मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. इंतजामिया मशिद समितीही याबाबत सहकार्य करत आहे. आधी त्यांनी सर्वेक्षण पथकाला तळघराची चावी देण्यास नकार दिला होता. मात्र आता त्यांनी ही चावी पथकाकडे सुपूर्द केली आहे.

Exit mobile version