राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले. याच दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांचेही वक्तव्य समोर आले आहे. दिल्लीतील निर्णय आम्हालाही मान्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच यासाठी प्रत्येकाची संख्या देखील पाहिली जाते, असे अजित पवार यांनी म्हटले. छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
ते म्हणाले, उद्या आम्ही तिन्ही नेते उद्या दिल्लीला जाणार आहोत उर्वरीत चर्चा तिथे होणार आहे. त्यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ हे निश्चित होईल. पुढे अधिवेशनाचा काळ आहे, बरीच कामे आहेत. मात्र, सर्वजण अनुभवी असल्यामुळे अडचण येणार नसल्याचेही ते म्हणाले.
दिल्लीच्या उद्याच्या मिटींगमध्ये जो काही निर्णय घेतला जाईल, तो आम्हाला देखील मान्य असेल. मुख्यमंत्री म्हणून तुमचेही नाव चर्चेत होते, तुमच्या कार्यकर्त्यांची मागणी होती, असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, कार्यकर्त्यांना काहीही वाटत असले तरी शेवटी, प्रत्येकाची संख्या, कोणाचे किती लोक निवडून आले याकडेही पाहिले जाते. मागच्या अडीच वर्षा पाठीमागची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा :
देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा, शिंदेंनी दिला पाठींबा
मविआकडून १४ कोटी मतदारांचा अपमान!
झारखंडमध्ये भाजपला मतदान केले म्हणून हिंसाचार