कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात ‘दुर्गा पूजा समित्यां’नी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेली ८५,००० रुपयांची अनुदान रक्कम घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. सुरक्षेच्या मागणीकरिता महिला रस्त्यावर उतरल्या असताना सरकारकडून अनुदानाची रक्कम स्वीकारता येत नाही, असे दुर्गा पूजा समितीचे म्हणणे आहे.
हुगळीतील भद्रकाली बौठान संघाच्या अध्यक्षा रीना दास म्हणाल्या की, ‘आमच्या सदस्यांच्या भावनांचा आदर करण्यासाठी आम्ही यावर्षी या अनुदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला हे अनुदान अनेक वर्षांपासून मिळत आहे.’ उत्तरपारा शक्ती संघाचे प्रसेनजीत भट्टाचार्य म्हणाले, हे एक सांकेतिक प्रदर्शन आहे. ‘जोपर्यंत दोषीला पकडून न्यायाच्या कटघऱ्यात उभे करून, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही ही रक्कम स्वीकारणार नाही.’
हे ही वाचा :
जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या हाती नेतृत्व !
सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला !
आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे
जीपीएस बिघडल्याने दिशा चुकली, अन जीवाला मुकले !
मुर्शिदाबादमधील ‘लालगोला कृष्णपूर सन्यासीतला’ आणि नादियातील ‘बेथुदहारी टाउन क्लब’सह इतर समित्यांनीही रक्कम नाकारण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांना कळवले आहे. जाधवपूर येथील हायलँड पार्क दुर्गोत्सव समितीनेही ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला आहे. समितीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आंदोलन आणि न्यायाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही एकमताने अनुदान सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”