बृहन्मुंबई महानगरपालिका पुढच्या महिन्यात येवई येथे क्लोरिन इन्जेक्शन पॉइंटची दुरूस्ती करणार असल्यामुळे एक दिवस नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
या दुरूस्तीमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने १५ टक्के पाणीकपात घोषित केली आहे. ही कपात ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत लागू असणार आहे.
या दुरुस्तीचा मोठा फटका दक्षिण मुंबईतील अनेक वॉर्ड्सना बसणार आहे. एफ- साऊथ (परळ) आणि एफ- नॉर्थ (दादर पूर्व, माटुंगा) हा भाग आणि पूर्व- पश्चिम उपनगांत केवळ १५ टक्के पाणीकपात होईल. त्यामुळे या प्रभागांना फारसा फटका बसणार नाही असे समजते.
ही संपूर्ण २४ तासांची पाणी कपात बृ.मुं.म.पा करणार असलेल्या दुरूस्तीमुळे आहे. ही दुरूस्ती वैतरणा तलावातून पुरवठा करणाऱ्या मार्गिकेवरील येवई येथे करण्यात येणार आहे.
मागील महिन्यात ‘बृ.मुं.म.पा’ने २२ डिसेंबर रोजी अजून एका क्लोरिन इंजेक्शन पॉईंट दुरूस्त करून तिथला एक वॉल्व्ह दुरूस्त केला.
मुंबईची प्रतिदिन पाण्याची गरज ३,९५० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा तलावात १,४४७,३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठ्याची फारशी चिंता करण्याची गरज नाही.