गेटवे ऑफ इंडिया वरून बेलापूरला जा आता वॉटर टॅक्सीने

४ फेब्रुवारीपासून सेवा सुरू होणार

गेटवे ऑफ इंडिया वरून बेलापूरला जा आता वॉटर टॅक्सीने

नको रेल्वे नको बस आता गेटवे ऑफ इंडिया वरून बेलापूर थेट वॉटर टॅक्सीने गाठता येणे शक्य होणार आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटीने नयनतारा शिपिंग कंपनीला जल प्रवासी सेवा चालविण्यास मान्यता दिली आहे. येत्या ४ फेब्रुवारीपासून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूरपर्यंत वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे.

‘नयन इलेव्हन’ असे या वॉटर टॅक्सीचे नाव आहे. या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर १४० प्रवासी आणि वरच्या किंवा बिझनेस क्लासच्या डेकवर आणखी ६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.वॉटर टॅक्सी बेलापूरहून सकाळी ८.३० वाजता निघेल आणि ९.३० वाजता गेटवे ऑफ इंडियाला पोहोचेल. दुसरी फेरी गेटवे ऑफ इंडिया येथून संध्याकाळी ६.३० वाजता सुटेल आणि ७.३० वाजता बेलापूरला पोहोचेल. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या तिकिटांची किंमत खालच्या डेकसाठी २५० रुपये आणि वरच्या किंवा व्यावसायिक श्रेणीच्या डेकसाठी ३५० रुपये असेल.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

ही सेवा तिच्या आरामदायी आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे लोकप्रिय होईल. याशिवाय, बेलापूर स्टेशनपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी बेलापूर जेट्टीसाठी शेअरिंग ऑटो रिक्षा देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, गेटवे ऑफ इंडियावर, दक्षिण मुंबईतील विविध व्यावसायिक भागांत प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी शेअरिंग टॅक्सी तसेच बस सेवा आहेत असे कंपनीने म्हटले आहे.दक्षिण मुंबईत खाजगी वाहनांनी आणि टॅक्सीने किंवा गर्दीच्या वेळेत प्रवास करणारे या सेवेचा पर्याय निवडू शकतात कारण यामुळे गर्दी टाळण्यास मदत होईल आणि त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचू शकेल.

Exit mobile version