देशातील १० काेटी कुटुंबे जलवाहिनीद्वारे शुद्ध पाण्याच्या सुविधेशी जोडली गेली आहेत. प्रत्येक घरात पाणी पाेहचवण्याच्या सरकारच्या माहिमेचे उदाहरण असून ‘सबका प्रयास’चे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी म्हटलं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीतीद्वारे ते संबाेधित करत हाेते.
स्वातंत्र्याच्या सात दशकांमध्ये केवळ ३ काेटी कुटुंबांकडे नळाद्वारे पाणी मिळण्याची सुविधा हाेती असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, देशात सुमारे १६ काेटी ग्रामीण कुटुंबांना पाण्यासाठी बाह्यस्त्राेतांवर अवलंबून रहावे लागत हाेते. गावात राहणाऱ्या इतक्या माेठ्या लाेकसंख्येला पाण्यासारख्या मूलभूत गरजेची पूर्तता करण्यासाठी झगडावे लागत हाेते. हे लक्षात घेऊन मी तीन वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देण्यात येईल अशी घाेषणा केली हाेती असंही पंतप्रधान माेदी यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर
१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास
उपक्रमात सातत्य ठेवल्याचे फळ
या उपक्रमावर ३ लाख ६० हजार काेटी रुपये खर्च केला जात आहे. नळाद्वारे पाणी उपक्रमाच्या पूर्ततेला प्रारंभ झाला आणि १०० वर्षातून एकदा येणारे महामारीचे संकट आले. पण काेराेनामुळे नळाद्वारे जल उपक्रमाच्या पूर्ततेचा वेग कमी झाला नाही. या कामामध्ये सातत्य ठेवल्यामुळे अवघ्या तीन वर्षात देशाने सात दशकात केलेल्या कामापेक्षा दुप्पट कार्य करून दाखवले असून हे मानव केंद्रीत विकासाचे उदाहरण आहे. याबद्दलच मी या वर्षी लाल किल्ल्यावरून बाेललाे हाेताे असेही पंतप्रधान म्हणाले.
नवीन तंत्रज्ञानाचा उपयाेग
या याेजनेच्या कामामध्ये तंत्रज्ञानाचा उपयाेग केला जात असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, जल संपत्तीचे जिओ टॅगिंग आणि पाणी पुरवठा तसेच गुणवत्ता नियंत्रणासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज साेल्युशन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्या जात आहे. लाेकशक्ती, महिला शक्ती आणि तंत्रज्ञानाची शक्ती जल जीवन मिशनला जास्त बळ देत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.