मुंबईत १० टक्के पाणी कपात

मुंबईत १० टक्के पाणी कपात

Photo credit ANI

मुंबईत काही दिवसांनी पाणीकपात लागू होणार आहे. मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे धरणावरील झडपांची दुरुस्ती करायची असल्याने मुंबई महानगरपालिकेने पाणीकपात लागू केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरील न्यूमॅटिक झडपांच्या तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक १७ मे २०२१ ते शुक्रवार, दिनांक २१ मे २०२१ पर्यंत पाणीकपात करण्याची घोषणा मुंबई महापालिकेने केली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं

कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान, अनलॉक होणार?

मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुंबईत यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली नाही किंवा पाणी कपात करण्याची वेळही आलेली नाही. परंतु आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने दुरुस्तीची कामं हाती घेतल्याने पाणी कपात जाहीर करावी लागत आहे.

पुढच्या आठवड्यात पाच दिवसांमध्ये मुंबईकरांना पाणी कमी दाबाने आणि कमी कालावधीसाठी मिळण्याची शक्यता आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये सोमवार, दिनांक १७ मे २०२१ ते शुक्रवार, दिनांक २१ मे २०२१ या कालावधीत १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. महापालिकेनेही या कालावधीत नागरिकांना सावध करण्यासाठी सूचना जारी केली आहे.

याआधी, मुंबईत फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारे दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवसांसाठी पाणी कपात करण्यात आली होती. सायन, दादर, परेल, लालबाग, माटुंगा या भागात पाणीकपात करण्यात आली होती.

Exit mobile version