मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाल्याचे शुक्रवारी झालेल्या काही तासांच्या बातमीने स्पष्ट झाले. पाणी तुंबणार नाही, हे दावे पुन्हा पाण्यात बुडाले. मुंबईतील नदीपात्रातील भराव हे मुख्य कारण पाणी तुंबण्याचे आहे. तसेच मेट्रो कारशेडच्या जागेतही मोठ्या प्रमाणात भराव घालण्यात आलेला आहे. नद्यांच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती यामुळे आरेमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. विलेपार्ले येथील काही चाळींमधील घरांमध्ये गुडघाभर पाण्यात रहिवाशांना राहावे लागले होते.
आरेमधील युनिट २२ जवळील रस्ताही जलमय झाला होता. डोंगर उतारावर असणारा ओहोळ भरून वाहू लागल्याने, रहिवाशांच्या येण्या-जाण्याचा रस्ता सुद्धा बंद झाला होता. तसेच ‘ओशिवरा आणि मिठी नदीच्या आरेतून जाणाऱ्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या भिंतीमुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. यामुळेच जमिनीवरील पाणी नदीत आणि नदीतील पाणी जमिनीवर येऊ शकत नाही अशी अवस्था झाली होती. याचाच परिणाम म्हणून, गतवर्षी सुद्धा आरे परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचलेले होते.
हे ही वाचा:
सचिन वाझेने केला जामिनासाठी अर्ज
मोदी-पवार भेट! कशासाठी झाली तासभर चर्चा?
मुसळधार पावसात घरांवर बुलडोझर; नागरिक बेघर
मराठी माणसाची घरे तोडणाऱ्या ठाकरे सरकारकडून भातखळकरांना अटक
मुख्य बाब म्हणजे, नदीच्या सर्वोच्च पाणी पातळीपेक्षाही १५ ते २० फूट उंचीपर्यंत भराव टाकण्यात आला. त्यामुळेच पुराचे पाणी बाहेर ओसरण्यासाठी जागाच आता उरलेली नाही. पश्चिम द्रुतगती मार्गावरील पाणी साचल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली. मिठी नदीनेही मुसळधार पावसात धोक्याची पातळी ओलांडल्याच्या वृत्ताचे पालिकेने खंडन केले. भर मुसळधार पाऊस झाल्यावर पालिकेने पाणी तुंबणार नाही याचे दावे पावसाच्या पाण्यासकट वाहून गेले.