जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्यात बुडली मंदिरे

सरोवराची पातळी का वाढली

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्यात बुडली मंदिरे

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाली आहे. जवळपास १४ वर्षानंतर सरोवराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे सरोवरातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आसपासची प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर आता त्याची चर्चा रंगली आहे. लोणार सरोवराचा अभ्यास करणारे अभ्यासक आता या पाणी पातळी वाढी मागील करणे शोधात आहेत.

यंदा बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. खूप पाऊस झाल्यामुळे या सरोवरातील सरोवरातील झरे पाझरू लागले आहेत. येथील अनेक पाण्याचे झरे हे डिसेंबर महिन्यात अजूनही वाहत आहेत. त्यामुळं लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील सात आश्चर्यांपैकी एक मानले जाणाऱ्या लोणार सरोवराला रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळाला असून ते अभ्यासकांसाठी नेहमीच संशोधन आणि अभ्यासाचा विषय ठरले आहे या एकाच सरोवरात खाऱ्या आणि गोड पाण्याचे प्रवाह आहेत. मंगळ ग्रहावरील बेसॉल्टिक पर्वतापासून तयार झालेली सरोवरे आणि लोणार सरोवर यात बहुतांश साम्य असल्याचे सांगीतले जाते त्यामुळे या सरोवराचा मंगळ ग्रहाशी देखील संबंध जोडला जातो.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

याआधी सरोवराचे पाणी झाले होते लाल

काही वर्षांपूर्वी या सरोवरातील पाणी अचानक लालसर झाल्यामुळेही लोणार चर्चेत आले होते. त्यावेळी अभ्यासकांनी लोणार सरोवरातील पाण्यात विशिष्ट प्रकाराच्या हॅलो बॅक्टेरीया व शेवाळाच्या संयोगातून पाणी लालसर झाले असावे असा अंदाज व्यक्त केला होता. तर काही तज्ज्ञांनी डुनलेलीया अल्गी व हॅलो बॅक्टेरीया या जीवाणुंमुळे बेटा कॅरोटीन रंगद्रव्य निर्माण झाल्याने लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग लाल होत असल्याचे मत व्यक्त केले होते.

Exit mobile version