21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषजल हेच जीवन

जल हेच जीवन

Google News Follow

Related

कार्यकर्ते आणि संघटनेची योग्य बांधणी यामुळे महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघ यशस्वी झाला आहे, असे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भारतीय मजदूर संघप्रणित महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघाच्या १३ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, जल कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचारी असताना जीवन प्राधिकरण स्वीकारून मोठा त्याग केला. महाराष्ट्राला पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे अतिशय महत्वाचे काम जल कर्मचारी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या राष्ट्रीय फ्लॅगशिप कार्यक्रमात जल जीवन मीशन हा अत्यंत महत्वाचा आहे. हा कार्यक्रमही जल कर्मचाऱ्यांमुळेच यशस्वी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन म्हणून ठामपणे तुमच्या सोबत आहोत असेही मुनगंटीवार म्हणाले. भारतीय संस्कृतीत अन्नदानाचे जितके महत्व आहे त्यापेक्षा अधिक महत्व तहानलेल्याला पाणी पाजण्याचे आहे असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, संत एकनाथांनी तर तहानलेल्या प्राण्यांनाही पाणी पाजले होते.

भारतीय मजदूर संघाने कामगारांमध्ये देश के लिये करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम या घोषणेसह राष्ट्र प्रथम ही भावना रुजवली आहे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, संघटनेचे कार्यातले सातत्य हे कौतुकास्पद आहे. नेहमी पुढाऱ्यांसमोर घोषणा दिली जाते की, आगे बढो, हम आपके साथ है, मात्र आज तुम्हाला सांगायला आलो आहे की, कर्मचारी बंधू आप आगे बढो, हम आपके साथ है, असेही मुनगुंटीवार म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा