‘विषारी’ दाव्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी प्यायले यमुनेचे पाणी!

केजरीवालांचे आयुष्यभर खोटे बोलण्याचे काम, आताही तेच करत आहेत

‘विषारी’ दाव्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी प्यायले यमुनेचे पाणी!

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी बुधवारी (२९ जानेवारी) दिल्लीतील पल्ला गावाजवळ यमुना नदीवर जाऊन नदीचे पाणी प्यायले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरयाणा सरकारकडून यमुना नदीत विष मिसळले जाते असा गंभीर आरोप केल्यानंतर सध्या राजकारण तापले आहे. याच वादा दरम्यान, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यमुना नदीचे पाणी प्यायले आहेत.

यमुनेचे पाणी पिल्यानंतर नायबसिंग सैनी म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अशी भितीदायक वक्तव्ये केली आहेत, ती दुर्दैवी आहे. आज मी यमुना नदीच्या काठावर येऊन यमुना नदीचे पाणी प्यायले आहे. केजरीवाल आयुष्यभर खोटे बोलले आहेत आणि आता ही तेच करत आहेत. जलसंपदा प्राधिकरणाने येथून पाण्याचे नमुने घेतले असून पाण्यात विष आढळून आल्या नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

तत्पूर्वी, हरियाणा सरकारचे मंत्री विपुल गोयल यांनी बुधवारी सांगितले की, यमुनेमध्ये “विष” मिसळल्याच्या विधानाबद्दल आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. सोनीपत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गोयल म्हणाले, “केजरीवाल यांनी दिल्ली आणि हरियाणातील लोकांमध्ये दहशत पसरवणारे बेजबाबदार विधान केले आहे. हरियाणा सरकार त्यांच्याविरुद्ध सोनीपत येथील सीजेएम न्यायालयात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम २  (डी) आणि ५४ अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे.

हे ही वाचा : 

परीक्षेला बुरखा घालून बसण्याची परवानगी कशाला? लांगुलचालन खपवून घेणार नाही

सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात, नऊ भारतीयांचा मृत्यू!

तुरुंग अधिकाऱ्यांवर काफिर म्हणत केला हल्ला

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

दरम्यान, २७ जानेवारीला एका रॅलीत केजरीवाल म्हणाले होते की, दिल्लीच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यात येते आहे. भाजपा हे पाप करत असून त्यापेक्षा मोठे पाप कोणतेही नाही. हरयाणातून जे पाणी पुरवले जात आहे त्यात यांनी विष मिसळले आहे. केजरीवाल यांनी असेही म्हटले की, हे पाणी इतके विषारी आहे की, दिल्लीच्या पाणी शुद्धीकरण केंद्राकडून ते स्वच्छ होऊ शकत नाही तसेच भाजपा दिल्लीतील लोकांची असे पाणी देऊन सामूहिक हत्या करू इच्छिते.

चेकमेट करण्याची तयारी सुरू! | Mahesh Vichare | Dhananjay Munde | Santosh Deshmukh | Anjali Damania

 

Exit mobile version