महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी शहरातील G२० बैठकीचा एक भाग म्हणून सूचिबद्ध मेगा बीच क्लीन अप इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसले.G२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली.या बैठकीत शहरातील जुहू बीचवरील मेगा बीच क्लीन-अप इव्हेंटचा समावेश होता.जुहू समुद्रकिनारा येथे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ देवून जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली.
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समुदायाच्या सहभागाच्या भूमिकेबद्दल नागरिकांना संवेदनशील करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.मातृभूमी ही मानवी जीवनासाठी वरदान असून आपण त्याचे रक्षणकर्ते आहोत. त्यासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक कार्य पर्यावरणपूरक असावा, असा संदेश या स्वच्छता मोहिमेतून पोहोचावा असा विश्वास व्यक्त करून राज्य शासनानेही पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु केले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. जुहू येथील समुद्रकिनारा स्वच्छतेमध्ये सर्व २० देशाचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचे लक्षात घेऊन शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या आव्हानांना तोंड देत असताना पर्यावरणासाठी हे महत्वाचे आहे.
हे ही वाचा:
मान्सून आला!! अंदमानात तीन दिवस आधीच दाखल झाल्याने उत्साह !
राज ठाकरे, ही धरसोड नाही… हे आधीच ठरले होते!
कुठे आहे विरोधी ऐक्य? कर्नाटक शपथविधीला सोनिया, ममता आणि ठाकरे गैरहजर !
सुषमा अंधारेंनी ठाकरेंवर असे काय गारुड केले?
समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींचे, शिंदे यांनी आभार मानले.शिंदे यांनी पंतप्रधान मोदींनी २०१४ साली सुरु केलेल्या भारत मिशनवरही प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले, देशभरातील बहुतेक गावे आणि शहरे स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत आहेत.त्यानंतर त्यांनी निदर्शनास आणून दिले की राज्य सरकारने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काही कार्यक्रम आधीच सुरु केले आहेत.या मोहिमेत केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.