कुस्तीगीर अंकितसोबत मोदींनी साजरे केले स्वच्छता अभियान

स्वच्छता,आरोग्यसंपन्न आणि आयुष्यात आनंदी कसे राहता येईल यावर केली चर्चा

कुस्तीगीर अंकितसोबत मोदींनी साजरे केले स्वच्छता अभियान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैलवान अंकित बैयनपुरीया सोबत १ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियानात भाग घेत आरोग्यसंपन्न आणि आयुष्यात आनंदी कसे राहता येईल याबाबत चर्चा केली.प्रधानमंत्री मोदी यांनी याबाबतचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

“स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी देशभरात “एक तारीख एक तास” उपक्रम साजरा करण्यात येत आहे.पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.पंतप्रधान मोदी यांनी पैलवान अंकित बैयनपुरीया सोबत साफसफाई करत अनेक गोष्टींवर चर्चा केली. पंतप्रधान यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हणाले, आज देश स्वच्छतेवर आपले लक्ष केंद्रित करत आहे, अंकित बैयनपुरीया आणि मी सुद्धा तेच केले आहे. केवळ स्वच्छतेशिवाय आम्ही आरोग्यसंपन्न आणि आयुष्यात आनंदी कसे राहता येईल याबाबतही चर्चा केली.

 

हे सर्व स्वच्छ आणि स्वस्थ भारताच्या भावना बद्दल आहे.व्हिडिओमध्ये अंकित सोबत पंतप्रधान एकाबागेत स्वच्छता करताना दिसत आहेत.या व्हिडिओमध्ये पंतप्रधान अंकितला सांगत आहेत की, देशात स्वच्छतेबाबत लोकांमध्ये आवड निर्माण होत आहे.तसेच ते म्हणतात, मी दोन कामांमध्ये शिस्त आणू शकलो नाही, एक म्हणजे जेवण आणि दुसरे म्हणजे झोपण्याची वेळ.पैलवान अंकित सोशल मीडियामार्फत फिटनेसबाबत लोकांच्या मणी प्रेरणा देण्याचे जे काम करतो त्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्याचे कौतुक केले.

हे ही वाचा:

शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध

अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबरपासून शटडाऊनचे संकट

२५ कोटींच्या लुटीचा कट दिल्लीच्या ठगाने एकट्याने नेला तडीस

विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!

पैलवान अंकितने शेअर केले अनुभव

अंकित व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना म्हणतो की, निरोगी वातावरणामुळे आपण निरोगी राहतो. तो आपल्या फॉलोअर्सना ७५ दिवसांच्या आव्हानात पाच नियमांना आत्मसात करून पालन करण्यास सांगतो. पहिला म्हणजे दिवसातून दोन वेळा शारीरिक व्यायाम, ४ लिटर पाणी, कोणत्याही पुस्तकातील १० पाने रोज वाचणे आणि दिवसभरातील खाण्या-पिण्याच्या दिनक्रमाचा रोज एक सेल्फी घेणे.

 

अंकितचे आई-वडील करतात मजुरी

अंकित हरियाणातील सोनिपत जिल्यातील बयांपुर शहरातील रहिवासी आहे.त्याचे सोशल मीडियावर चार लाखांपेक्षा अधीक फॉलोअर आहेत.त्याच्या परिवारात वडील आणि आई मजुरीचे काम करतात आणि अंकितने सुद्धा जगण्यासाठी अनेक प्रकारचा संघर्ष केला आहे. अंकित कुस्ती खेळायचा परंतु त्याला खेळताना इजा झाल्यामुळे कुस्ती सोडावी लागली.तो सोशल मीडियावर फिटनेसबाबत माहिती देण्याचे काम करतो. त्याने ‘एंडी फ्रीसेल्लाच्या’, ‘७५ दिवसांच्या कठीण’ आव्हानांशी प्रेरित होऊन स्वतः ७५ दिवसांचे आव्हान स्वीकारले,त्याचे पालन केले आणि याबाबतची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली.अंकितने भगवद् गीतेचे वाचन केले आहे आहे तो शिव-पुराण वाचत आहे.

Exit mobile version