रामायणात रामसेतूचा उल्लेख तुम्ही लहानपासूनच ऐकत असाल. हा मार्ग भगवान रामाच्या वानर सेनाने माता सीताला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी रामेश्वर बेट आणि श्रीलंकेच्या मन्नार बेटाच्या दरम्यान बांधला आला होता. आता या रामसेतूच्या संदर्भात इस्रोच्या शाश्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. इस्रोच्या शाश्त्रज्ञांनी रामसेतूचा समुद्राखालचा नकाशा तयार केला आहे. अमेरिकन सॅटेलाइट डेटाच्या मदतीने समुद्राखालील रामसेतूचा नकाशा तयार करण्यात आला आहे.
दक्षिणेत या सेतूला ‘रामसेतू’ याचं नावाने ओळखलं जातं, तर श्रीलंकेत याला ‘अडंगा पालम’ किंवा ‘अॅडम्स ब्रिज’ असे म्हटले जाते. भारतीय शास्त्रज्ञांनी राम सेतूचा (Adam’s Bridge) तपशीलवार नकाशा तयार केला आहे. समुद्राखालचा आजपर्यंतचा सर्वात मोठा नकाशा आहे. नासाच्या ICESat-२ या सॅटेलाईटच्या मदतीने इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी रामसेतूचा नकाशा तयार केला आहे. संशोधकांनी ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील ICESat-२ डेटाचा वापर करून बुडलेल्या रिजच्या संपूर्ण लांबीचा १०-मीटर रेझोल्यूशन नकाशा तयार केला आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयचा नकार
रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याप्रकरणी एल्विश यादवला समन्स
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी भगवद्गीता हातात घेऊन घेतली खासदारकीची शपथ
हा नकाशा रेल्वेच्या बोगी/कंपार्टमेंटइतका मोठा आहे. या नकाशानुसार २९ किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर इतकी आहे. राम सेतूचा ९९.९८ टक्के भाग उथळ आणि अतिशय उथळ पाण्यात बुडाला आहे. गिरीबाबू दंडबथुला यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने पुलाखाली ११ अरुंद वाहिन्यांचा शोध लावला आणि निरीक्षण केले. या नाल्यांची खोली २-३ मीटर इतकी होती. यामुळे मन्नारचे आखात आणि पाल्क सामुद्रधुनी दरम्यान पाण्याचा प्रवाह सुलभ झाला. रामसेतूबाबत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. दरम्यान, भूवैज्ञानिक पुराव्यांच्या मदतीने देखील रामसेतूचे रहस्य उलघडणार आहे. हा रामसेतू प्रभू रामाच्या काळात बांधला गेला का याचीही माहिती समोर येणार आहे.