युद्धनौका निघाल्या विश्व सफारीवर

सहा खंड व तीन महासागरांमध्ये भारतीय तिरंगा फडकणार

युद्धनौका निघाल्या विश्व सफारीवर

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिम्मित भारतभर विविध कार्यक्रम होत आहेत. त्यात आता भारतीय नौदलाने सुद्धा सहभाग घेतला आहे. या उपक्रमात नौदलातील ८ युद्धनौका विश्व सफारीवर रवाना झाल्या आहेत. त्या विविध देशांना व बंदरावर भेटी देणार आहेत. याद्वारे सहा खंड व तीन महासागरांमध्ये भारतीय तिरंगा युध्दनौकांद्वारे फडकवला जाणार आहे.

या मोहिमेमध्ये प्रथम युद्धानौका सफरीसाठी ‘आयएनएस चेन्नई’ (विनाशिका) व दुसरी युद्धनौका ‘आयएनएस बेतवा’ (फ्रिगेट) या ओमानची राजधानी मस्कतला रवाना झाली आहे. तर तिसरी युद्धनौका ‘आयएनएस शरयू’ सिंगापूर येथे रवाना झाली आहे. चौथी युद्धानौका आफ्रिकेतील केनया येथील मोम्बसासाठी ‘आयएनएस त्रिकंड’ रवाना झाली आहे. पाचवी युद्धनौका ‘आयएनएस सुमेधा’ ही ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे रवाना झाली आहे. उत्तर अमेरिका खंडातील सफारीसाठी सहावी युद्धनौका ‘आयएनएस सातपुडा’ ही अमेरिकेतील सॅन दिएगो येथील बंदराला भेट देणार आहे. सातवी युद्धनौका दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमधील रिओ डी जानीरोला ‘आयएनएस तर्कश’ ही फ्रिग्रेट नौका भेट देणार आहे. आठवी युद्धनौका आयएनएस तारांगिणी ही लंडनसाठी रवाना झाली आहे.

तसेच भेटीतंर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ‘आयएनएस तारांगिणी’ दुसऱ्या महायुद्धादरम्यान हुतात्मा झालेल्यांना लंडनमध्ये आदरांजली वाहणार आहे. तसेच दुसऱ्या महायुद्धावेळी केनियातील तैता तावेता युद्धभूमीवर भारतीय सैनिकांनी शौर्य गाजवले होते. या युद्धांचे स्मरण म्हणून स्तंभाचे उदघाटन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आफ्रिकेतील मोम्बासा येथे होणार आहे. तसेच सैनिकांचे स्मरण म्हणून युद्धानौकेवर तैनात असलेल्या नौसैनिकाकडून केले जाणार आहे.

हे ही वाचा:

अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?

१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

सुवर्णपदक हुकलेल्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन

याशिवाय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त नौदलाने ७५ बंदरांना भेटी दिल्या आहेत. तसेच मुंबई येथे राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन, सर्व जिल्यातील किनारपट्टी लगत सामाजिक कार्यक्रम, पर्वतारोहण, सायकल मोहीम, रक्तदान शिबीरे, किनारपट्टी स्वच्छता मोहीम, शौर्य पुरस्कार विजेते आणि युद्धातील वीरांचा सत्कार आदी कार्यक्रम भारतीय नौदलाने हाती घेतले आहेत.

Exit mobile version