26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषआषाढी एकादशीपूर्वीच वारकऱ्यांना सरकारकडून भेट; पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

आषाढी एकादशीपूर्वीच वारकऱ्यांना सरकारकडून भेट; पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना

Google News Follow

Related

अवघ्या दोन दिवसांवर आषाढी एकादशी आली असून राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय करण्यात आला आहे. या महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपूर येथे असणार आहे. तसेच या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. तर, वारकरी कित्येक दिवस चालत आषाढी वारीत सहभागी होत माउलींच्या दर्शनासाठी पोहोचतात. वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. मात्र, आता दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. याकरिता वारकरी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या ११ जुलै २०२४ रोजीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता आणि कल्याणकारी योजना राबवण्याकरिता ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ कार्य करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडचणी सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे याचा समावेश आहे.

पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तीऋषी संत सावता माळी समाज मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर आणि इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची देखील उपाययोजना महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वरचा विकास करणे.

हे ही वाचा:

१५ तासांहून अधिक काळापासून कोकण रेल्वे ठप्प! प्रवासी रेल्वे स्थानकात अडकले

१२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्पेनने इंग्लडला नमवत युरो चॅम्पियनशिप जिंकली

अब की बार १० करोड पार !

पोटगीबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल, सर्व पीडित मुस्लिम महिलांना लागू होईल काय?

राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहेत. या महामंडळाला भांडवल देण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंढरपूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त काही सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा