वक्फ बोर्डाने सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकर न वापरण्याच्या आपल्याच निर्णयावरून माघार घेतली आहे. त्यामुळे सकाळी अदा केल्या जाणाऱ्या अजानसाठी कर्नाटकात लाऊडस्पीकर अजूनही वापरला जाणार आहे.
कर्नाटकातल्या वक्फ बोर्डाने दिनांक ९ मार्च रोजी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. या पत्रकानुसार मशिदी, दर्गे यांना रात्री १० ते सकाळी ६ या काळात लाऊडस्पिकर वापरण्यावर निर्बंध घातले होते. कर्नाटक सरकारच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या ध्वनि प्रदुषणाच्या नियमांनुसार हे निर्बंध घातले होते. मात्र यात सकाळच्या अजानचा समावेश नसेल असे त्यांनी सांगितले. अजान ही सामान्यपणे सकाळी ५ च्या सुमारास अदा केली जाते.
हे ही वाचा:
‘धनानंदां’च्या कचाट्यातून सुटकेसाठी धडपडणारा महाराष्ट्र
मी तुम्हाला बंगालच्या लोकांच्या विकासाला आणि स्वप्नांना लाथ मारू देणार नाही
राज्य सरकारकडून मशिदीवरील भोंग्यांच्या वापरावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हज आणि वक्फ मंत्री आनंद सिंग हे मौलवी आणि मुल्ला यांची भेट घेणार होते. त्यांच्यासोबत चर्चा करून शहरात रात्री भोंगे बंद असावेत यासाठी बोलणी करण्यात येणार होती. यावेळी रमजान, बकरी ईद अशा प्रसंगात मशिदीवरील लाऊडस्पीकरच्या वापराला परवानगी दिली आहे.
दरम्यान प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगगुरूंनी देखील मशिदीवरील भोंग्यांचा त्रास होतो म्हणून पत्र लिहीले होते. त्या पत्रात त्यांनी अलाहाबादच्या उच्च न्यायलयाने दिलेल्या एका निर्णयाला देखील उद्धृत केले आहे. त्यावर कारवाई करत हे भोंगे बंद देखील करण्यात आले.