26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषवक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे...

वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे कुठे?

भाजपकडून काँग्रेसवर टीका

Google News Follow

Related

वक्फ बोर्ड देशभरातील अनेक जमिनींवर दावा करत आहे. त्यामुळे लोक आपली कामे सोडून प्रकरण सोडवण्यात व्यस्त आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातून समोर आला आहे. कर्नाटकातील विजयपुरा येथील शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. वक्फ बोर्डानेही शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. वास्तविक, विजयपुरा जिल्ह्यातील होनवाडा गावात १२०० एकर जमिनीवर शाह अमिनोद्दीन दर्ग्याने आपला हक्क व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीसमध्ये ही जमीन शाह अमिनोद्दीन दर्ग्याच्या मालकीची असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा दर्गा शतकानुशतके अस्तित्वात नाही, तर पिढ्यानपिढ्या या जमिनींचे मालक त्यांचे कुटुंबीय आहेत. ही जमीन वक्फमध्ये गेल्यास आम्ही रस्त्यावर येऊ, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सुमारे ४१ शेतकऱ्यांना नोटिसा मिळाल्या असून त्यांना मालकी हक्काची कागदपत्रे देण्यास सांगण्यात आले आहे.

ही नोटीस १९७४ च्या राजपत्रातील घोषणेवर आधारित असल्याचा वक्फ बोर्डाचा दावा आहे. वक्फ बोर्डाच्या म्हणण्यानुसार, ही जमीन राज्य सरकारने वक्फ मालमत्ता म्हणून ओळखली होती आणि ती राजपत्रित करण्यात आली होती. मात्र, काही शेतकऱ्यांना चुकून नोटिसा पाठवण्यात आल्या. वक्फ बोर्डाच्या म्हणण्यानुसार, जर शेतकऱ्यांकडे जमिनीच्या वैध नोंदी असतील तर वक्फ बोर्ड त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही.

या प्रकरणावरून भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. एका विशिष्ट धर्माला खूश करण्यासाठी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात देण्याचा कट रचत असल्याचा आरोप तेजस्वी सूर्या यांनी केला. दरम्यान, प्रकरण वाढताच कर्नाटकचे विजयपुरा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एम.बी. पाटील यांनी शनिवारी (२६ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत वक्फ मालमत्तेच्या वादावर स्पष्टीकरण दिले. यातील केवळ ११ एकर जमीन ही वक्फ मालमत्ता आहे, तर उर्वरित जमीन शेतकऱ्यांची असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!

बाबा सिद्दीकी प्रकरणी अटक केलेला आरोपी सुजित सुशील सिंगकडून धक्कादायक माहिती उघड!

दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी!

काँग्रेस महाविकास आघाडीत राहील असे वाटत नाही!

पत्रकार परिषदेत मंत्री पाटील म्हणाले की, ११ एकरांपैकी १० एकर आणि १४ गुंठे कब्रस्तान असून, उर्वरित २४ गुंठे जागेत एक ईदगाह, मशीद व इतर बांधकामे आहेत. ते म्हणाले, ‘उर्वरित जमीन शेतकऱ्यांची आहे, याला तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.’ ते पुढे म्हणाले, विजयपुरा जिल्ह्यातील वक्फ मालमत्तांच्या अधिसूचना १९७४ , १९७८ आणि २०१६ मध्ये जारी करण्यात आल्या होत्या.

वास्तविक वक्फ मालमत्ता महाल बागायतमध्ये आहे, परंतु राजपत्रात चुकून महाल बागायतच्या पुढे होनवाडा हे नाव जोडले गेले. ‘शेतकऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला असता, मी १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य प्रकारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते, असे मंत्री पाटील म्हणाले. शेतकऱ्यांची जमीन वक्फ मालमत्ता म्हणून ग्राह्य धरली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या बबलेश्वर विधानसभा मतदारसंघातील होनावडा गावातील १० सर्व्हे नंबरमधील केवळ ११ एकर जमीन ही वक्फ मालमत्ता आहे. १९७४ च्या अधिसूचनेतील ही चूक १९७७ मध्ये वक्फ बोर्डाने सुधारली आणि होनवाडाचे नाव रेकॉर्डमधून काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. कागदपत्रात आकस्मिक बदल केल्याने हा गोंधळ झाल्याचे तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा