लातूरमधील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा

निजामकालीन कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असल्याचा दावा

लातूरमधील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा

लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बोर्डाने ३०० एकर जमिनीवर दावा केला आहे.

यासंदर्भात गावातील लोकांना विचारण्यात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ही भीती दिसत आहे. एका व्यक्तीने सांगितले की, दोन महिने झाले या नोटिसा आल्या होत्या आम्ही यासंदर्भात मग वकिलांकडे गेलो. त्यांना ही नोटीस दाखविली. वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे की, आम्ही या जमिनी गावकऱ्यांना दिल्या होत्या, आता त्या त्यांनी आम्हाला द्याव्यात. त्यावर गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, आधीच एक दोन एकर जमीन आमच्याकडे आहेत. वक्फ बोर्डाने त्या देखील घेतल्या तर शेतकऱ्यांनी काय करायचे?

शेतकऱ्यांनी आपल्याकडील कागदपत्रेही दाखविली. निजामकालिन राजवटीपासूनची कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. पण वक्फ बोर्डाने केलेल्या या दाव्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण वक्फ बोर्डाने एकदा दावा केला की, ती जमीन आपल्या हातून गेली अशीच जनमानसात भावना आता तयार झाली आहे.

हे ही वाचा:

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

लग्न सोहळ्यात थुंकून रोट्या बनवणाऱ्या साहिलला अटक!

शिंदेंची मनधरणी कुणी केली? फडणवीसांनी सांगितली कहाणी!

शंभूराजे म्हणाले, ठाकरेंनी आमच्याकडे बोट दाखवून स्वतः मुख्यमंत्री झाले!

एका शेतकऱ्याने या जमिनीबाबतचे हैदराबादचे गॅझेट दाखवले. तेव्हापासूनचे हे दस्तावेज शेतकऱ्याकडे आहे. त्याचे म्हणणे होते की, बिदर हा जिल्हा होता तेव्हापासूनचे हे दस्तावेज आमच्याकडे आहे. तेव्हा आमच्या पूर्वजांनी जमीन खरेदी केली होती.

सध्या संसदेत वक्फ कायद्याविरोधातील विधेयक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या कायद्यामुळे अनेक जमिनी हडपल्या गेल्या असून त्या परत घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा कायदा रद्द व्हावा अशी देशभरातील लोकांची मागणी आहे.

 

Exit mobile version