लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताने वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतरही यावर वाद सुरू आहे. विरोधी पक्षाचे नेते सातत्याने या विधेयकाचा विरोध करत आहेत. गुरुवारी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात वक्फ विधेयकाच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत. यावर भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, छाती पिटून काही होणार नाही. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाले असून आता सर्वांना ते मान्य करावे लागेल.
गुरुवारी आयएएनएसशी संवाद साधताना आमदार रामेश्वर शर्मा म्हणाले, “भारताच्या संविधानाच्या अंतर्गत लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ विधेयक पारित करण्यात आले आहे. आता याचा विरोध तेच लोक करत आहेत, ज्यांनी वक्फच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला होता. भारत सरकार आता ही अतिक्रमित जमीन परत घेईल आणि ती गरीब मुस्लिमांच्या कल्याणासाठी वापरेल.”
हेही वाचा..
ऑलिंपिकमधल्या समावेशाने रजत चौहान रात्रभर झोपले नाहीत
बाटलीत पेट्रोल न दिल्याने मॅनेजरला गोळ्या घातल्या!
अरविंद सावंत, वर्षा गायकवाड गद्दार!
तहव्वुर राणाला काय शिक्षा व्हावी ?
ते पुढे म्हणाले, “वक्फ कायद्याअंतर्गत वक्फ मालमत्तेचा लाभ आता गरीब मुस्लिमांना मिळणार आहे, ज्यांना अनेक वर्षे तथाकथित मुस्लिम नेत्यांनी फसवले आणि शोषण केले. वक्फ बोर्डाने मुस्लिमांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे भारत सरकारने जो वक्फ कायदा आणला आहे, तो सर्वांना मान्य करावा लागेल. हे विधेयक भारताच्या संविधानाच्या अधीन राहूनच लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे.”
सूत्रांच्या माहितीनुसार, वक्फ विधेयकाच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड गुरुवारपासून ‘वक्फ बचाओ मुहिम’ (वक्फ वाचवा मोहिम) सुरू करणार आहे. ७ जुलैपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, जिल्हास्तरावर आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. बोर्डाने देशभरातील सुमारे ५० शहरांमध्ये पत्रकार परिषद घेण्याची योजना आखली आहे. राजधानी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरही एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.