भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅचचा फिव्हर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्ताकडे आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने आमचा संघ पाकिस्तानात खेळणार नाही, अशी भूमिका घेतली.
क्रिकेटमधील भारताचा दबदबा पाहता आयसीसीने भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० ऑगस्टपासून ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तानशी २ सप्टेंबरला भिडणार आहे. साखळी फेरीतील सामने खेळल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा सुपर- ४ मध्ये पाकिस्तानशी भिडण्याची शक्यता आहे. आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानी खेळाडूंनी गरळ ओकण्यास सुरूवात केली आहे. पाकचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसने एक अजब विधान केले आहे.
हे ही वाचा:
मणिपूर; महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !
वाढदिवस साजरा न करण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका
संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर अटकेत
भारताने पाकिस्तानात खेळणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानची चिडचिड आता समोर येऊ लागली आहे. यामुळेच पाकिस्तानी संघ भारताला जगात कुठेही पराभूत करू शकतो, असा मिश्कील दावा वकार युनूस याने केला आहे. लाहोरमधील आशिया चषक स्पर्धेच्या चषकाच्या अनावरण सोहळ्यात वकार युनूस म्हणाला, बाबर आझम आणि कंपनीने बाजी मारली असून मोठ्या स्पर्धांमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्यास सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा पुन्हा एकदा पराभव करण्यासाठी पाक संघ सज्ज आहे. पाकिस्तान संघ भारताला कडवी झुंज देत आहे. पाकिस्तान संघ कुठे खेळतो हे महत्त्वाचे नाही. भारताला आम्ही ओव्हलमध्ये पराभूत केले आहे त्यामुळे भारताला आम्ही कुठेही हरवू शकतो, असे वकार युनूस यांनी म्हटले आहे.