संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात

मलाही लष्करात सामील व्हायचे होते, आणि एकदा मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला बसलो. मी लेखी परीक्षा दिली. पण, माझ्या वडिलांच्या मृत्यूसह कुटुंबातील काही कौटुंबिक अडचणींमुळे मी सैन्यात रुजू होऊ शकलो नाही, अशी आठवण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितली.आसाम रायफल्स आणि भारतीय लष्कराच्या ५७ व्या माऊंटन डिव्हीजनच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी ही आठवण सांगितली.

एखाद्या मुलाला लष्कराचा गणवेश दिला तर त्याचे व्यक्तीमत्व बदलते. या गणवेशात एक करिष्मा असल्याचंही संरक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संरक्षणमंत्र्यांनी यावेळी भारत- चीन संघर्षाच्यावेळी सुरक्षा दलांनी दाखवलेल्या शौर्याचं कथन केलं. त्यावेळीच्या लष्करप्रमुखांनी आणि जवानांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल देश त्यांचा सदैव ऋणी राहील असंही ते म्हणाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत.”डॉक्टर, अभियंते आणि चार्टर्ड अकाउंटंट हे एक ना एक प्रकारे देशासाठी योगदान देत असले तरी, तुमचा व्यवसाय हा व्यवसायापेक्षा आणि सेवेपेक्षा अधिक आहे असे मला वाटते,” असे सिंह म्हणाले.

हे ही वाचा:

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटकn

जवानांच्या भेटीमुळे अभिमानाची भावना येते

मी कोठेही जातो त्यावेळी लष्कराच्या जवानांना भेटतो. माझ्या मणिपूर दौऱ्याचे नियोजन झाल्यावर मी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडे आसाम रायफल्स आणि भारतीय लष्कराच्या ५७ व्या माऊंटन डिव्हीजनच्या जवानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. लष्करातील जवानांच्या भेटीमुळे मला अभिमानाची भावना येते, असेही ते म्हणाले.

Exit mobile version