वाँटेड माओवादी कमांडर छोटू खरवार झारखंडमध्ये चकमकीत ठार!

१५ लाख रुपयांचे होते बक्षीस

वाँटेड माओवादी कमांडर छोटू खरवार झारखंडमध्ये चकमकीत ठार!

झारखंडमधील लातेहारमधील नवाडीह भागात मंगळवारी (२६ नोव्हेंबर) रात्री माओवादी गटांमधील अंतर्गत चकमकीत कुख्यात माओवादी कमांडर छोटू खरवार ठार झाला आहे. याच्यावर १५ लाख रुपयांचे बक्षीस होते. छोटू खरवार हा मूळचा लातेहारच्या छिपडोहर सिकिद गावचा रहिवासी आहे, त्याला माओवादी संघटनेत ‘सुजित जी’ म्हणून ओळखले जात होते.  पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. छोटू खरवारचा मृत्यू हा सीपीआय माओवादी संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

माओवादी छोटू खरवारला खंडणी, खून, सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसारख्या १०० हून अधिक गुन्ह्यांमध्ये वाँटेड घोषित करण्यात आले होते. झारखंड पोलिसांनी जाहीर केलेल्या १५ लाख रुपयांच्या बक्षीसशिवाय राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) त्याच्या अटकेसाठी ३ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

हे ही वाचा : 

मविआकडून १४ कोटी मतदारांचा अपमान!

देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा, शिंदेंनी दिला पाठींबा

झारखंडमध्ये भाजपला मतदान केले म्हणून हिंसाचार

दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी जम्मूमध्ये एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात !

छोटू खरवार हा सीपीआय माओवादी प्रादेशिक समितीमध्ये कार्यरत होता. ऑगस्टमध्ये, पोलिसांनी त्याच्या घरी पोस्टर चिकटवले होते, ज्यामध्ये त्याला ३० दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

२०१६ मध्ये बालुमठ पोलिसांनी चिटफंड कंपनीचे व्यवस्थापक चंदन कुमार यांच्याकडून ३ लाख रुपये जप्त केले होते. त्यावेळी ही रक्कम माओवादी छोटूची असल्याचा दावा चंदन कुमारने केला होता. तपासादरम्यान छोटू खरवारची २६ लाख रुपयांची गुंतवणूक उघड करणारी डिपॉझिट स्लिपही सापडली. या आर्थिक आघाडीमुळे एनआयएने जानेवारी २०१८ मध्ये या प्रकरणाचा ताबा घेतला. माओवादी छोटूची पत्नी ललिता देवी हिला देखील ऑक्टोबर २०१९ मध्ये माओवादी निधी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

 

Exit mobile version