रेल्वेत नोकरी करायची आहे? मग हे वाचा…

रेल्वेत नोकरी करायची आहे? मग हे वाचा…

सरकारी नोकरीसाठी उत्सुक असलेल्या अनेकांसाठी खुशखबर भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. उत्तर मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वेत काम करण्यास उत्सुक असलेल्या अनेक तरूणांना दिलासा मिळणार आहे. उत्तर मध्य रेल्वेने प्रशिक्षणार्थींच्या जागेसाठी अर्ज मागवले आहेत. विविध जागांसाठी पात्र उमेदवार rrcpryj.org या संकेतस्थळाला भेट देऊन, त्यावरून अर्ज करू शकतात. या अर्जप्रक्रियेला २ ऑगस्ट २०२१ पासून सुरूवात होणार असून, अर्ज करण्याची अंतिम दिनांक १ सप्टेंबर २०२१ असणार आहे. या भरतीद्वारे १६६४ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.

या प्रक्रियेतून निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील विविध विभागांसाठी निवडले जाणार आहे. त्यांना नियुक्त केलेल्या विभागांमध्ये अधिनियम १९६१ अंतर्गत प्रशिक्षित केले जाणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. या सोबतच वेल्डर, वायरमन, सुतार इत्यादी पदांसाठी देखील संधी उत्तर मध्य रेल्वे मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हे ही वाचा:

लवलीनाच्या यशाचं फळ अक्ख्या गावाला मिळणार

दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्यांना दणका

‘तो’ विषय आमच्यासाठी संपलेला आहे

नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट,नो पेट्रोल’

त्यासाठी उमेदवारांनी किमान ८ वी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. त्याशिवाय आयटीआय प्रमाणपत्र देखील असणे अपेक्षित आहे. या विविध पदांसाठी वयोमर्यादा १५ ते २४ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत तर अनुसुचित जाती, जमाती, महिला व इतर आरक्षित गटांंतील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क लागू नाही.

Exit mobile version