अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यावर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. इडीकडून होत असलेली कारवाई योग्य नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये कॉर्डेलीया क्रुझवर एका ड्रग्ज राकेटचा भांडाफोड त्यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. या ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि काही लोकांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती. या नंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. एनसीबीच्या अंतर्गत चौकशीत असे दिसून आले की एजन्सीच्या “माहिती नोट” मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटची नावे शेवटच्या क्षणी समाविष्ट करण्यात आली होती.
याशिवाय, फोन जप्त करण्याचे दस्तऐवज, स्टेटमेंट रेकॉर्ड करणे यासारख्या प्रक्रिया वानखेडे यांच्या पथकाने योग्य पद्धतीने केल्या नसल्याचे तपासात आढळून आले आहे.एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, वानखेडे अभिनेता शाहरुख खानसोबतच्या चॅटचा वापर त्याच्या सचोटीचा पुरावा म्हणून करू शकत नाही कारण त्याने या गप्पा “गुप्त” ठेवल्या आहेत.