अंबरनाथमधील थरारपट… नदी बने नाला!

अंबरनाथमधील थरारपट… नदी बने नाला!

एमएमआरडीएच्या आराखड्यात वालधुनी ही अंबरनाथमधील नदी आता नाल्यात गणली गेलेली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. मुंबई शहराच्या आसपासच्या नद्या या सद्यस्थितीत अतिशय बिकट अवस्थेत आहेत. वालधुनी नदीमधील तर रासायनिक पाण्यामुळे पाण्यातील जलचरांना आता धोका निर्माण झालेला आहे. असे असूनही आपल्याकडे पर्यावरणाच्या बाबतीत काही करण्यास मात्र ठाकरे सरकारकडून पावले अजूनही उचलली जात नाहीत. नदीत रासायनिक पाण्यामुळे जीव धोक्यात आले आहेत. तसेच नदीचे पाणी दूषित होऊन हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कारखान्यातील रासायनिक पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित झालेले आहे.

वालधुनी नदी टाहुली डोंगरातून उगम पावते. ही नदी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण शहरातून वाहते. परंतु एमएमआरडीएच्या आराखड्यात या नदीचा उल्लेख चक्क नाला असे करण्यात आल्यामुळे एकूणच नदीचे प्रदुषण हा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.

हे ही वाचा:
निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या

ट्रान्स हार्बर लिंकसाठी येणार ५५० झाडांवर संक्रात

भारत- श्रीलंका मालिकेलाही कोरोनाचा फटका

‘या’ बँकेचं १००% खासगीकरण होणार

अंबरनाथ, उल्हासनगरमधील सांडपाणी वालधुनी नदीत सोडल्यामुळे वालधुनीची अवस्था गटारगंगेसारखी झालेली आहे. प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी गोष्टी प्रस्तावित केलेल्या आहेत यामध्ये वालधुनी नदीचा उल्लेख हा नाला असे केलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा आता स्थानिकांसाठी अतिशय संवेदनशील झालेला आहे. वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी असलेले अनेक प्रकल्प हे केवळ शासनदरबारी फाईलमध्येच पडून आहेत. स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमी यांनी अनेकदा पाठपुरावा करूनही याबाबत मात्र कुठलेही पावले उचलली जात नाही.

त्यातच आता वालधुनी नदीचा उल्लेख नाला असे केल्यामुळे अनेकांना एमएमआरडीएचा आता राग आलेला आहे. एमएमआरडीए नदीच्या फारशी उत्साही दिसत नाही असेच आता स्थानिकांना वाटत आहे.

Exit mobile version