राजस्थानमधील अजमेरमधून वाजीद खान नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सोशल मिडीयावर भारताविरोधी वादग्रस्त, भडकाऊ संदेश लिहिल्याचा वाजीद खानवर आरोप आहे. वाजीदच्या पोस्टवरून अनेकांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर राजस्थान पोलिसांनी वाजीदला अटक केली आणि पुढील चौकशी सुरु आहे.
अटक करण्यात आलेला वाजीद हा स्वतःला अल जझीराचा पत्रकार म्हणून सांगतो, तसेच अमेरिकेत राहत असल्याचा दावा करतो, स्वतःच्या ट्वीटर प्रोफाईलमध्ये त्याने तसे नमूद केले आहे. परदेशी आणि दहशतवादी गटांबद्दल बोलून भारतातील वातावरण बिघडवण्याचा आरोप वाजीदवर ठेवण्यात आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांबद्दल सहानभूती आणि पाठींबा दिल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. वाजीदच्या वादग्रस्त, भडकाऊ संदेशमुळे अनेक सोशल मिडियावापरकर्त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
हे ही वाचा :
नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू
मसुरीतील चहा थुंकी प्रकरण: मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसनला बेड्या!
महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक
बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणकाम मजुरांवर गोळीबार; २० जण ठार
एका युजरने अजमेर पोलिसांनी टॅग करत वाजीद हा अजमेरमधील व्यक्ती असल्याचे सांगितले. यानंतर सोशल मिडीयावर वाजीदवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. अखेर अजमेर पोलिसांनी वाजीदला अटक करून ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.