ठाणे येथील ‘व्यास क्रिएशन’ ही प्रकाशन संस्था वाचकांसाठी ‘सावरकर परिवार विशेषांक’ घेऊन येत आहे. हा अंक म्हणजे सावरकर प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून सावरकर परिवाराची माहिती आणि कार्य उलगडले जाणार आहे.
व्यास क्रिएशन संस्था दर्दी वाचकांसाठी आपला चैत्र पालवी विशेषांक घेऊन येत आहे. ‘सावरकर परिवार’ असा या विशेषांकाचा विषय असणार आहे. पण या विशेषांकाच्या निमित्ताने एक वेगळीच कल्पना व्यास क्रिएशन तर्फे प्रत्यक्षात उतरवली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा परिवार हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींपर्यंत मर्यादित नसून तो अतिशय व्यापक होता,आजही आहे. त्यांच्या सोबत काम करणारे क्रांतिकारक, त्यांच्या विचारांनी भारलेल्या व्यक्ती, संस्था हे देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या परिवाराचाच भाग आहेत. त्यामुळे त्यांचाही परिचय या विशेषांकाच्या माध्यमातून वाचकांना करून देण्यात येणार आहे. यासाठी ‘व्यास क्रिएशन’ तर्फे अशा व्यक्ती आणि संस्थांना आपली माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सावरकर विचारांनी प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी आपली माहिती पाठवण्यासाठी आणि विशेषांकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ९९६७७९६२५४ किंवा ०२२-२५४४७०३८ या क्रमांकावर संपर्क करावा असे ‘व्यास क्रिएशन’ कडून सांगण्यात आले आहे. हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हा अंक प्रकाशित केला जाणार आहे.