व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार!

राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला, 'आयपीएल २०२४' मध्ये एलएसजीचे मार्गदर्शक होण्याची शक्यता

व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार!

राहुल द्रविड भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार आहेत.एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे.तसेच ‘इंडियन प्रीमियर लीग २०२४’ च्या हंगामापूर्वी राहुल द्रविड लखनौ सुपर जायंट्समध्ये मार्गदर्शक म्हणून सामील होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती.तसा करारही झाला होता.राहुल द्रविड यांच्यात झालेल्या दोन वर्षांच्या करारानुसार ‘एकदिवसीय विश्वचषक २०२३’ च्या स्पर्धेनंतरद्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे.तसेच राहुल द्रविड हा करार वाढवण्यास उत्सुक नसल्याची माहिती आहे.’इंडियन प्रीमियर लीग २०२४’ ची आता सुरुवात होणार आहे.इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या हंगामापूर्वी राहुल द्रविड लखनौ सुपर जायंट्समध्ये मार्गदर्शक म्हणून सामील होतील अशी चर्चा आहे.

दरम्यान, भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड नंतर व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नंबर लागणार आहे.व्हीव्हीएस लक्ष्मण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख देखील आहेत.राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया T२०I मालिकेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण पूर्णवेळ कार्यभार स्वीकारतील असे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

आता संजय राऊत म्हणतात, इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता!

अंतरावालीत पिस्तुलासह अटक झालेला ऋषीकेश बेदरे कोण?

शालेय आहारात अंडी कशाला? शाकाहारच हवा!

‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!

स्पोर्ट्स टाक या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपलेला आहे.राहुल द्रविड यांना पुन्हा भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवायचा नाही, कारण राहुल द्रविड लखनौ सुपर जायंट्समध्ये मार्गदर्शक म्हणून जाणार आहेत आणि तशी बोलणी देखील राहुल द्रविड करत असल्याचे दिसत आहे.जर राहुल द्रविड भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपला कार्यकाळ वाढवला नाही तर राहुल द्रविड एलएसजीला मार्गदर्शक म्हणून जाऊ शकतील, अशी माहिती स्पोर्ट्स टाक या वृत्तवाहिनीने दिली.दुसरीकडे, मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण कायम राहू शकतील असे देखील सांगितले आहे.

“या सर्वांवर चर्चा करण्यासाठी लवकरच एक बैठक होणार आहे, प्रत्येकाला प्रशिक्षक आणि संघाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी बोलावले जाईल,” असे सूत्राने स्पोर्ट्स टाकला सांगितले.

दरम्यान, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, भारताने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग १० सामने जिंकून सर्वाधिक दबदबा निर्माण केला होता. स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने भारतीय संघ ट्रॉफी जिंकण्यात अयशस्वी झाला.भारताच्या या पराभवानंतर राहुल द्रविड म्हणाले होते की, भारतीय संघाने अशा मोठ्या स्पर्धांमधून शिकणे महत्त्वाचे आहे.

 

Exit mobile version