महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने देण्यात येणारा व्रतस्थ पत्रकारिता पुरस्कार ‘हिंदुस्थान पोस्ट’ चे संपादक स्वप्नील सावरकर यांना जाहीर झाला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावरकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सातारच्या अण्णाभाऊ साठे सभागृहात गुरुवारी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
याबरोबरच दैनिक लोकमतचे छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, रसिका मुळ्ये, ज्ञानेश्वर बिजळे यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, लोकमत वृत्त समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, दैनिक पुढारी समूहाचे डॉ. योगेश जाधव उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा..
उत्तराखंडमध्ये बेपत्ता ट्रेकर्सच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, आणखी ५ दगावले!
‘भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सची तिसऱ्यांदा अवकाशात झेप’
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान आणि श्रीलंकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार?
अयोध्येतील पराभवानंतर रामायणातील ‘लक्ष्मण’ नाराज
याच कार्यक्रमात राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोशाध्यक्ष प.पू. गोविंददेव दिरी महाराज यांनाही जीवन गौरव पुर्स्व्कार देण्यात येणार आहे. यावेळी शिववंदना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक आणि पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली.