आज विधानसभेसाठी होणार मतदान

आज विधानसभेसाठी होणार मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतके आहेत. ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४ हजार १३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१ पुरूष, ३६३ महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे.

हे ही वाचा:

बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…

तावडे यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत!

राहुल गांधींजी हा पोरकटपणा नाहीतर दुसरं काय?

दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १ लाख १८६ मतदान केंद्रांसाठी २ लाख २१ हजार ६०० बॅलेट युनिट, १ लाख २१ हजार ८८६ कंट्रोल युनिट व १ लाख ३२ हजार ९४ व्हीव्हीपॅट इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध आहेत.

राज्यात एकूण महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे.

 

Exit mobile version