लोकशाहीच्या उत्सवाचा अंतिम टप्पा; ५७ जागांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

पंतप्रधान मोदी उभे असलेल्या वाराणसी मतदार संघातही होणार मतदान

लोकशाहीच्या उत्सवाचा अंतिम टप्पा; ५७ जागांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

देशात सुरू असलेला लोकशाहीचा उत्सव आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण ५७ जागांसाठी मतदान होत आहे.

सातव्या टप्प्यात केंद्रशासित प्रदेश चंदीगड, पंजाबमधील सर्व १३ जागा, हिमाचल प्रदेशातील चार, उत्तर प्रदेशमधील १३, पश्चिम बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा आणि झारखंडमधील तीन लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. शिवाय ओडिशाच्या उर्वरित ४२ विधानसभा जागांसाठी आणि हिमाचल प्रदेशच्या सहा विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकाही एकाच वेळी होणार आहेत. आकडेवारीनुसार, सातव्या टप्प्यात जवळपास ५.२४ कोटी पुरुष, ४.८२ कोटी महिला आणि ३५७४ तृतीयपंथीसह एकूण १०.०६ कोटी लोक मतदान करतील.

सातव्या टप्प्यात वाराणसी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन केंद्रीय मंत्री राजकुमार सिंग आणि अनुराग ठाकूर यांचे भवितव्यही मतदान पेटीत बंद होणार आहे. शिवाय या टप्प्यात चार कलाकारही रिंगणात आहेत. कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हे देखील निवडणूक लढवत आहेत.

हे ही वाचा:

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…

…आणि अचानक मनमोहन सिंग जागे झाले!

अंतिम टप्प्यात मतदान करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून आवाहन

लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे मोदी म्हणाले आहेत. तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावतील, अशी अपेक्षा त्यांनी ठेवली आहे.

Exit mobile version