अतिक अहमद, शहाबुद्दीन आणि मुख्तार अन्सारी यांच्या नावाने मते !

संभलमधील समाजवादी पक्षाचे उमेदवार झिया उर रहमानवर गुन्हा

अतिक अहमद, शहाबुद्दीन आणि मुख्तार अन्सारी यांच्या नावाने मते !

सोमवारी (२९ एप्रिल) संभल लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार झिया उर रहमान बारक यांच्यावर अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांच्याबद्दल भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात झिया उर रहमान व्यतिरिक्त इतर पाच अनोळखी व्यक्तींचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
संभलमधील चमन सराय परिसरात रहिवाशांना भेटत असताना दिवंगत माजी खासदार शफीकुर रहमान बारक यांचे नातू झिया उर रहमान यांनी, रविवारी, २८ एप्रिल रोजी मोहोम्मद शहबुद्दीन मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांची कुर्बानी म्हणून मते मागितली. त्यावेळी आमदार कुंदरकि म्हणाले, हि कुर्बानी भाजपाच्या काळात झाली आहे. मेरी गुजारिश है आप सब लोगों से, कसम है आप लोगों को, की उनकी कुर्बानी को झाया मत होना दे. भारतीय जनता पार्टी का सुपडा साफ हो कर रहेगा.

हेही वाचा..

तामिळनाडूतील करियापट्टी येथील दगडखाणीत स्फोट!

नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभेच्या रिंगणात

कोलंबिया विद्यापीठात गोंधळ!

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली यांचा भाजपात प्रवेश!

शहाबुद्दीन साहब, अतिक अहमद साहब किंवा मुख्तार अन्सारी साहब यांचे काय झाले ते कोणीही विसरू शकत नाही. मी सर्वांना विनंती करतो की, त्यांनी दिलेले बलिदान विसरु न देण्याची शपथ घ्यावी. निवडणुकीत भाजपचा पराभव झालाच पाहिजे. ते म्हणाले, भाजप बुलडोझर दाखवून आमच्यात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
झिया उर रहमान बरक यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल बोलताना, श्रीश चंद्र, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (संभल) यांनी सांगितले की, ते झिया उर रहमान यांच्या भाषणाच्या व्हिडिओ फुटेज बघत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, संशयितांवर आयपीसी कलम १७१-सी (निवडणुकीदरम्यान अवाजवी प्रभाव), १५३ए (धर्म आणि वंशाच्या आधारावर विविध गटांमध्ये द्वेष निर्माण करणे) आणि १८८ (नियमांचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की झिया उर रेहमानने आपल्या संबोधनात “विशिष्ट धर्माशी संबंधित असभ्य गुन्हेगारांना नायक” म्हणून वर्णन केले, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडली. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये अतिक अहमदचा पोलिस कोठडीत गोळ्या झाडून मृत्यू झाला होता आणि मुख्तार अन्सारी यांचा गेल्या महिन्यात बांदा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री आझम खान हे अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर सध्या सीतापूर तुरुंगात आहेत.
त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यावर प्रतिक्रिया देताना झिया उर रहमान बारक म्हणाले, जेव्हा भाजपने नियमांचे उल्लंघन केले, तेव्हा कोणतीही कारवाई केली जात नाही, जेव्हा मी भाषण केले तेव्हा गुन्हा दाखल केला जातो. ही एकतर्फी कारवाई आम्ही विसरणार नाही.

Exit mobile version