26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमतदारांची ओळख पटवण्यासाठी बुरखा काढायला लावला!

मतदारांची ओळख पटवण्यासाठी बुरखा काढायला लावला!

माधवी लता यांचा एक व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

Related

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांचा सोमवारी एका मतदान केंद्रावर मुस्लिम महिला मतदारांची ओळख पटवत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माधवी लता विशेषत: बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांना त्यांची ओळख पटावी यासाठी त्यांना बुरखा काढण्यास सांगत असल्याचे दिसत आहे.
भाजप उमेदवार माधवी लता यांनी महिलांना हे मतदान कार्ड किती वर्षापूर्वी बनवले आहे? असा प्रश्न केला. त्यांनी अधिक पडताळणीसाठी आधार कार्ड दाखवण्याची विनंती केली. याबाबत माधवी लता म्हणाल्या, मी एक उमेदवार आहे. कायद्यानुसार, उमेदवाराला फेस मास्कशिवाय ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. मुस्लिम महिलांना त्यांचे बुरखे काढायला सांगणे ही मोठी गोष्ट नसावी कारण ती देखील एक महिला होती, असा त्यांनी केला आहे.

हेही वाचा..

‘देशात एनडीए ४०० जागा जिंकण्याच्या मार्गावर!’

मुंबईत अवकाळी पावसाची धडक; मेट्रो सेवा ठप्प, विमान सेवा दुसरीकडे वळवल्या

अरेरे!! विश्वंभर चौधरींची मतदान करण्याची संधी हुकली; मविआचे एक मत गेले

जपानला मागे टाकून भारत होणार चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था
“मी पुरुष नाही, मी एक स्त्री आहे आणि खूप नम्रतेने, मी त्यांना फक्त विनंती केली आहे – मी कृपया ओळखपत्रे पाहू शकेन का? जर एखाद्याला त्यातून मोठा मुद्दा बनवायचा असेल तर याचा अर्थ ते घाबरले आहेत, असे त्या म्हणाल्या. हा व्हीडीओ व्हायरल होताच माधवी लता यांच्याविरोधात मलकपेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीच्या दिशेने बाण सोडण्याच्या कृतीची नक्कल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर माधवी लता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघात माधवी लता या विद्यमान खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि ज्येष्ठ बीआरएस नेते गद्दम श्रीनिवास यादव यांच्या विरोधात उभ्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा